हौशे-गवशेच पक्ष सोडून जातील; गिरीश महाजनांचा टोला

"पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे-गवशे आहेत तेच जातील", असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला (Girish Mahajan slams Eknath Khadse).

हौशे-गवशेच पक्ष सोडून जातील; गिरीश महाजनांचा टोला
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 5:19 PM

जळगाव : “पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे-गवशे आहेत तेच जातील”, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता ते कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्षबांधनीचे काम जोरात सुरु आहे. याबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंवर निशाणा साधला (Girish Mahajan slams Eknath Khadse).

“राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील”, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला (Girish Mahajan slams Eknath Khadse).

भाजपच्या 60 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर जळगावमध्ये भाजपला गळती लागली आहे. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत आज भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंकडून सुरु असलेल्या या पक्षबांधनीबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंना टोला लगावला.

भाजपला ताकद दाखवतो : खडसे

दरम्यान, “आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल”, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली आहे. “जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली.

गिरीश महाजन आणि खडसेंमध्ये शाब्दिक युद्ध

फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनपूर्वक रसद पुरवून गिरीश महाजन यांना जिल्ह्यात मोठे गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन अशी दोन शक्तीकेंद्रे उभी झाली होती. आता एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

यापूर्वी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे गेल्याने भाजपला कोणताही फरक पडणार नाही, असे वक्तव्य केले होते. तेव्हा आगामी काळात कोणाच्या पाठी किती लोक उभे आहेत, हे दिसूनच येईल, असा पलटवार एकनाथ खडसे यांनी केली. यानंतर गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुमच्या जाण्याने पक्षात अनागोंदी माजेल, असे समजू नका, असे महाजन यांनी खडसेंना सुनावले होते.

संबंधित बातम्या : 

जळगावात राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु; खडसेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आता भाजपला ताकद दाखवतो, उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी; एकनाथ खडसेंची गर्जना

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांशी आमचा संबंध नाही : गिरीश महाजन

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.