गोवा विधानसभा: गोव्याची सध्याची राजकीय परिस्थिती काय?

पणजी: मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Goa CM Manohar Parrikar) यांच्या निधनाने गोव्यातील राजकीय घडामोडीचा गुंता वाढला आहे. भाजपकडे असलेलं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीत (Goa vidhan sabha) सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने गोव्याच्या राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. त्यामुळे येत्या काही तासात गोव्यातील राजकीय चित्र स्पष्ट होई शकतं. 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत आता […]

गोवा विधानसभा: गोव्याची सध्याची राजकीय परिस्थिती काय?
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:14 PM

पणजी: मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Goa CM Manohar Parrikar) यांच्या निधनाने गोव्यातील राजकीय घडामोडीचा गुंता वाढला आहे. भाजपकडे असलेलं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीत (Goa vidhan sabha) सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने गोव्याच्या राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. त्यामुळे येत्या काही तासात गोव्यातील राजकीय चित्र स्पष्ट होई शकतं. 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत आता मनोहर पर्रिकरांच्या निधनाने रिक्त जागांची संख्या 4 वर पोहोचली आहे.  गोवा विधानसभेसाठी 2017 मध्ये निवडणूक झाली होती.

मनोहर पर्रीकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तिथे आता पोटनिवडणूक घ्यावी लागेल.  त्याआधी पुढील महिन्यांत गोव्यात तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची जाहीर झालं होतं. 40 सदस्यसंख्या आता 36 वर आली आहे.

जागांचं समीकरण

सध्या गोव्यात भाजप युतीचं सरकार आहे. यामध्ये भाजप, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी सध्या काँग्रेसकडे सर्वाधिक 14 जागा आहेत.  तर भाजप आमदार फ्रान्सिस डिसूजा आणि मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने भाजपकडे आता 12 आमदारांचं बळ राहिलं आहे.  गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष असे 3-3 आमदार आहेत, तर 1 आमदार राष्ट्रवादीचा आहे.

गोव्याची राजकीय परिस्थिती काय?

गोव्यात मार्च 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 40 पैकी सर्वाधिक 17 जागा जिंकल्या. भाजपने या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला. पण 2 अपक्ष आमदारांनी तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या दोन पक्षांच्या प्रत्येकी 3 आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.

त्यांच्या अटीनुसार संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा गोव्याच्या राजकारणात येत मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यानुसार मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा 14 मार्च 2017 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली.

काँग्रेसला संधी

काँग्रेसकडे सध्या 14 आमदार आहेत. काँग्रेसने 2017 मध्ये 17 जागा जिंकल्या होत्या. मात्र सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी गेल्यावर्षी राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेस 2 आणि भाजप 2 सदस्य घटल्यामुळे विधानसभेचं संख्याबळ 40 वरुन 36 वर आलं आहे.

पोटनिवडणूक

गोव्यात 23 एप्रिलला शिरोडा, मांडरेम आणि मापुसा विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबतच होतील. आता पर्रिकरांच्या निधनाने पणजी विधानसभेतही पोटनिवडणूक होईल.

2017 मध्ये गोव्यात कुणाला किती जागा? goa vidhan sabha election result 2017

 • भाजप – 13
 • काँग्रेस – 17
 • राष्ट्रवादी काँग्रेस -1
 • महाराष्ट्रवादी गोमंतक – 3
 • गोवा फॉरवर्ड पार्टी – 3
 • अपक्ष/इतर – 3

गोवा विधानसभा पक्षीय बलाबल

एकूण जागा: 40

बहुमताचा आकडा : 21

रिक्त जागा- 4

सध्याचे संख्याबळ – 36

भाजप युती – 21 

 • भाजप- 12
 • मगोप– 3
 • गोवा फॉरवर्ड- 3
 • अपक्ष- 3

काँग्रेस आघाडी – 15

 • काँग्रेस -14
 • राष्ट्रवादी – 1

संबंधित बातम्या

गोव्यात ‘ही’ पाच नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत  

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर काळाच्या पडद्याआड 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें