AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर काळाच्या पडद्याआड

पणजी : गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 63 व्या वर्षी दीर्घ आजाराने मनोहर पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर कर्करोगाशी लढण्यात ते अपयशी ठरले. भारतीय राजकारणातील अत्यंत साधे आणि सुस्वभावी असं व्यक्तिमत्त्व मनोहर पर्रिकर यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड […]

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर काळाच्या पडद्याआड
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM
Share

पणजी : गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 63 व्या वर्षी दीर्घ आजाराने मनोहर पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर कर्करोगाशी लढण्यात ते अपयशी ठरले. भारतीय राजकारणातील अत्यंत साधे आणि सुस्वभावी असं व्यक्तिमत्त्व मनोहर पर्रिकर यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेलं. मनोहर पर्रिकर यांच्या निधानाची माहिती भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरुन दिली.

शाळा, महाविद्यालये बंद, 7 दिवसांचा दुखवटा

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने गोव्यात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी गोव्यातील शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. शिवाय गोव्यातील सोमवारच्या विविध परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

पर्रिकरांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

  • मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर सोमवार, 18 मार्च रोजी त्यांच्या अंत्यसंस्कार होणार आहेत.
  • त्याआधी सकाळी 9.30 ते 10.30 मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पणजी भाजप कार्यालयात ठेवण्यात येईल.
  • त्यांनतर 10.30 वाजता पर्रिकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कला अकादमी इथे नेण्यात येईल.
  • तिथे 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत पार्थिव सर्व नागरिकांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
  • दुपारी 4 वाजता पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मीरामार इथे नेण्यात येईल.
  • संध्याकाळी 4.30 वा. अंत्यविधी
  • संध्याकाळी 5 वा. पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

मनोहर पर्रिकरांवर कुठे, कधी झाले उपचार?

• मनोहर पर्रिकरांना ऍडव्हान्स स्टेजचा स्वादुपिंडाचा कॅन्सर • मुंबईतील लीलावती हॉस्पिटल, गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार • 4 फेब्रुवारी, 2018 पर्रीकरांची प्रकृती खालवली होती • 4 फेब्रुवारी, 2018 रोजी पर्रिकरांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले • 5 फेब्रुवारी 2018 ला मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले • 10 ऑगस्टला कॅन्सरच्या उपचारांसाठी पर्रिकर अमेरिकेत • सप्टेंबरमध्ये अमेरिकेहून भारतात परतले • सप्टेंबरमध्ये दिल्लीतील AIIMS मध्ये उपचारासांठी दाखल • 27 सप्टेंबर रोजी पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाल्याचे जाहीर • उपचारानंतर 14 ऑक्टोबरला ते गोव्यात परतले होते

मनोहर पर्रिकर यांचा अल्पपरिचय

13 डिसेंबर 1955 रोजी मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील मापुसा येथे जन्म झाला. मार्गोओ येथील लोयोला हायस्कूल येथे शिक्षण घेतलं. त्यांचं माध्यमिक शिक्षण मराठी भाषेतून झालं. पुढे 1978 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

आयआयटी शिक्षित मनोहर पर्रिकर हे भारतातील पहिले आमदार आहेत.

मनोहर पर्रिकर यांनी सुरुवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केलं. तरुण वयातच ते संघात मुख्य शिक्षक बनले. पुढे राजकारमात त्यांनी भाजपमधून प्रवेश घेतला.

1994 साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून गेले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2000 रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा कालावधी गोव्यात घालवला.

2014 साली केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर मनोहर पर्रिकर हे देशाचे संरक्षणमंत्री झाले. त्यासाठी उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर गेले. मात्र, गोव्यात राजकीय त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्याने, पर्रिकर पुन्हा गोव्यात परतले आणि मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली. मात्र, याच काळात त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. त्यामुळे वारंवार उपचारासाठी परदेशात जावं लागत होतं.

दिग्गजांकडून श्रद्धांजली :

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पर्रिकरांना श्रद्धांजली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पर्रिकरांना श्रद्धांजली :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पर्रिकरांना श्रद्धांजली :

लता मंगेशकर यांच्याकडून पर्रिकरांना श्रद्धांजली :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून पर्रिकरांना श्रद्धांजली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.