गोव्यात गेलो तरी ‘मी पुन्हा येईन’; व्यंगचित्राच्या माध्यमातून फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला

| Updated on: Sep 10, 2021 | 2:00 PM

भाजपने गोवा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. मात्र गोव्यापेक्षा महाराष्ट्रात सत्ता आली तर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची फडणवीस यांची सुप्त इच्छा आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची सत्ता फडणवीस आणतील का याबाबत क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

गोव्यात गेलो तरी मी पुन्हा येईन; व्यंगचित्राच्या माध्यमातून फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला
क्लाईड क्रास्टो यांची व्यंगचित्राद्वारे फडणवीसांवर टीका
Follow us on

मुंबई : गोव्याच्या बीचवर पर्यटकाच्या वेशभूषेत ‘मी पुन्हा येईन’ असा महाराष्ट्राला दिलेला गर्भित इशाऱ्याचा फलक घेऊन उभे असलेले देवेंद्र फडणवीस गोव्यात ‘फक्त पर्यटन’ करुन परतणार अशा आशयाचे व्यंगचित्र काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीसांची ‘सुप्त इच्छा’ समोर आणली आहे. भाजपने गोवा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. मात्र गोव्यापेक्षा महाराष्ट्रात सत्ता आली तर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची फडणवीस यांची सुप्त इच्छा आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची सत्ता फडणवीस आणतील का याबाबत क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून प्रश्नचिन्ह उभे केले आहे. (Clyde Castro Criticizes Opposition Leader Devendra Fadnavis through Cartoons)

क्लाईड क्रास्टो हे आपल्या कुंचल्यातून नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आणि भाजपवर फटकारे मारत असतात. आताही देवेंद्र फडणवीस यांची गोवा प्रभारी निवड झाल्यावर क्लाईड क्रास्टो यांनी गोवा बीचवर ‘आव गोयंचो सायबा’ म्हणत फडणवीस यांची रंगबिरंगी कपड्यातील पर्यटक अशी खिल्ली उडवली आहे. तिथेही जाऊन आपली ‘मी पुन्हा येईन’ ही सुप्त इच्छा प्रकट करत असल्याचा टोला व्यंगचित्राच्या कुंचल्यातून क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीची धुरा फडणवीसांच्या खांद्यावर

2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबह, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पाचरी राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फडणवीस हे भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील यावेळी फडणवीस यांच्यासोबत जी. किशन रेड्डी आणि दर्शना जर्दोश यांच्याकडे सह प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

फडणवीसांना विजयाचा विश्वास

गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा एकदा गोव्यात सत्ता स्थापन करु. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं गोव्यात जे काम केलं आहे. त्या कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकू. आमचे लाडके पर्रिकर यावेळी नसतील पण त्यांनी पक्षाला दाखवलेला मार्ग आणि दिशा कायम ठेवत आम्ही वाटचाल करु. महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी राहिला आहे. अमित शाह, नितीन गडकरी हे आमच्या पाठीशी आहेत. दोन केंद्रीय राज्यमंत्रीही आमच्यासोबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही गोव्यात सत्ता मिळवू असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलाय.

इतर बातम्या :

काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली, त्यांनीच चोरली-डाका मारला, नाना पटोलेंलं शरद पवारांना उत्तर

‘त्या’ सूचना केंद्राच्या गृहखात्याच्याच, नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी; विनायक राऊतांची खोचक टीका

Clyde Castro Criticizes Opposition Leader Devendra Fadnavis through Cartoons