आपण भज्यांवर खूश होतो, ते मटण खातात; वडेट्टीवार म्हणतात, पंकजा मुंडेंचे अश्रू समजून घ्या

औरंगाबाद येथे ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला संबोधित करताना विजय वडेट्टीवार बोलत होते. (vijay wadettiwar)

आपण भज्यांवर खूश होतो, ते मटण खातात; वडेट्टीवार म्हणतात, पंकजा मुंडेंचे अश्रू समजून घ्या
pankaja munde
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 4:11 PM

औरंगाबाद: पंकजा मुंडे यांची ओबीसी म्हणून पक्षात उपेक्षा झालीय. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. (Guardian minister vijay wadettiwar on bjp leader pankaja munde)

औरंगाबाद येथे ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला संबोधित करताना विजय वडेट्टीवार बोलत होते. सत्तेत असूनही विरोधकांसारखे वागले तर जनतेची कामे होतात. भावाभावांमध्ये भांडण लावून सरंजमदारी टिकवण्याचे काम आजवर केले गेले. सत्यनारायणाची पूजा आम्ही केली पाहिजे. बदाम आणि खारखा आमच्याच पोरांनी खाल्ली पाहिजे. पण दोघांच्या भांडणात सर्वाधिक लाभ ठाणेदाराचा होतो, हे लक्षात घ्या, असं वडेट्टीवार म्हणाले.

पहिल्या बाकावर कोण बसतं?

सत्ता कुणाच्याही पक्षाची आली तरी पहिल्या बाकावर कोण बसतं.? आम्ही फक्त बशा धुणारे झालो आहोत. आम्हाला भजे दिले की आम्ही त्यात खुश होतो. पण ते मटण खतायत ना. ज्यांच्यामुळे आपण मंत्री झालो त्यांच्यासाठी खापायला शिकलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांनी निधी दिला

यावेळी त्यांनी ओबीसींना एकत्र येण्याची हाकही दिली. खुर्चीचे चारही पाय हलवण्याची ताकद ओबीसी समाजात निर्माण झाली पाहिजे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये एकमत व्हावं लागतं. आमचे मुख्यमंत्री समजदार आहेत. ओबीसी हॉस्टेलला निधी मिळत नव्हता, मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून ओबीसी हॉस्टेलला निधी उपलब्ध करून दिला. ओबीसींना 2 हजार कोटी रुपये स्कॉलरशिप मिळते. मात्र फक्त 100 कोटी रुपये केंद्र सरकार देतं, असं त्यांनी सांगितलं.

त्या जागा कुणालाही देवू देणार नाही

इंपेरिकल डाटासाठी भाजप सरकारच्या काळातही पत्र पाठवण्यात आले होते. आमचं सरकार आल्यानंतरही आम्ही केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. पण केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही. ओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आमच्या हक्काच्या आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. (Guardian minister vijay wadettiwar on bjp leader pankaja munde)

 

संबंधित बातम्या:

आपलं बुवा रामदेवबाबांसारखं नाही, जेवढ्या गाई तेवढंच तूप विकतो; वडेट्टीवारांचा टोला

Tejas Thackeray : तेजस उद्धव ठाकरेंची राजकीय इनिंग सुरु? आता मिलिंद नार्वेकर म्हणतात, एक घाव, दोन तुकडे!

तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय, जीवसृष्टी सोडून राजकारणात येईल असं वाटत नाही: भुजबळ

(Guardian minister vijay wadettiwar on bjp leader pankaja munde)