Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना दिलासा, मात्र आता ताबा कोल्हापूर पोलिसांकडे! प्रकरण काय?

| Updated on: Apr 20, 2022 | 4:03 PM

गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुनच पवारांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सदावर्ते यांची अटक आणि जामिनाचा फेरा अजूनही सुरुच आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांकडे त्यांचा ताबा देण्यात आलाय.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना दिलासा, मात्र आता ताबा कोल्हापूर पोलिसांकडे! प्रकरण काय?
गुणरत्न सदावर्ते
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सातारा : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. मात्र, आता त्यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांना (Kolhapur Police) देण्यात आला आहे. त्यामुळे ‘आगीतून फुफाट्या’त अशीच काहीशी स्थिती सदावर्ते यांची होताना पाहायला मिळत आहे. हजारो एसटी कर्मचाऱ्यांसाठी न्यायालयात लढाई देणारे गुणरत्न सदावर्ते सध्या पोलिस कोठडी, न्यायालयीन कोठडीच्या चकरा मारत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर 100 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार राडा घातला होता. गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुनच पवारांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सदावर्ते यांची अटक आणि जामिनाचा फेरा अजूनही सुरुच आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांकडे त्यांचा ताबा देण्यात आलाय.

सदावर्ते मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा!

मराठा आरक्षणाच्या आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे गुणरत्न सदावर्ते पोलिसात तक्रार देण्यात आली. आधी सातारा त्या नंतर कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 18 एप्रिलला सातारा न्यायालायनं गुणरत्न सदावर्ते यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांना अर्थर रोड कारागृहात आणण्यात आलं. दरम्यान, एकीकडे गिरगाव पोलिसांनी सदावर्तेंनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सातारा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलाय.त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंचा ताबा मुंबई, सातारा यानंतर कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आलाय. 

सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर

एकीकडे गिरगाव कोर्टानं सदावर्तेंनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सातारा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलाय. त्याचवेळी कोल्हापूर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मागितला. तशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती. दरम्यान, सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना एककीडे दिलासा मिळाला होता. मात्र आता साताऱ्यानंतर त्यांची रवानगी कोल्हापुराला करण्यात आलीय.

सदावर्तेंविरोधातील साताऱ्याचं प्रकरण काय?

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल असं वक्तव्य झाल्याने याप्रकरणी एका तक्रारदाराने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. साधारण दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. यामुळे सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मागितला होता. त्यानुसार सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला होता.

इतर बातम्या :

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, गिरगाव कोर्टाचा निकाल, हिरवं रजिस्टर, केरळमधून कार खरेदी

Mumbai : मोठी बातमी, किरीट सोमय्यांप्रमाणे त्यांचे पुत्र नील सोमय्यांनाही कोर्टाचा दिलासा