Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, गिरगाव कोर्टाचा निकाल, हिरवं रजिस्टर, केरळमधून कार खरेदी

एसटी संपाच्या आंदोलनाच्या उत्तरार्धाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. शरद पवार यांच्यावरील हल्लाप्रकरणी सुरू झालेली तुरुंगवासाची फेरी काही केला थांबताना दिसत नाही. मुंबईतल्या गिरगाव न्यायालयानेही सदावर्तेंना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, गिरगाव कोर्टाचा निकाल, हिरवं रजिस्टर, केरळमधून कार खरेदी
Gunaratna SadavarteImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 2:31 PM

मुंबईः एसटी आंदोलनाच्या (ST strike) उत्तरार्धाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी सुरू झालेली त्यांची तुरुंगवासाची फेरी काही केला थांबताना दिसत नाही. मुंबईतल्या गिरगाव न्यायालयानेही (court) सदावर्तेंना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. गिरगाव कोर्टात आज याबाबत युक्तिवाद पार पडला. विशेष म्हणजे यावेळी स्वतः गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 200, 300 रुपये मी मर्जीने घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो ते पोलिसांनी सांगावे. माझ्याकडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांपैकी 48 हजार क्लायंट होते, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यानंतर कोर्टाने त्यांची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, सदावर्ते यांच्याविरोधात ठिकठिकाणी विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढताना दिसतायत.

सरकारी वकील काय म्हणाले?

सदावर्ते यांच्याबद्दल सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले की, कोल्हापूरच्या पोलिसांनीही त्यांचा ताबा देण्याची मागणी केली आहे. त्याची मागणी विचारातही घेतली आहे. आता जे कुणी आलेले असतील ते पोलिस त्यांचा ताबा घेतील. सत्र न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

नोटा मोजायचे मशीन अन्…

प्रदीप घरत म्हणाले की, सदावर्ते यांच्याकडे नोटा मोजायचं एक मशीन सापडले होते. एक हिरवे रजिस्टर सापडले. ज्यात सगळ्या नोंदी होत्या. काही संशयास्पद डॉक्युमेन्ट्स आढळले होते. त्यांच्या दोन जागा सापडलेल्या आहेत. एक कार त्यांनी 23 लाख रुपयांना केरळमधून घेतली आहे. त्याच्याबद्दल ही आम्हाला चौकशी करायची आहे.

सदावर्तेंनी मारली पलटी

सदावर्तेंचे म्हणणे आहे की, जागा मी अगोदरच घेतलेली आहे. कार मी घेऊन शकत नाही का, असा सवाल त्यांनी केला. मी फी म्हणून एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले. मात्र, यापूर्वी सदावर्ते यांनी एसटी कामगारांकडून एक पैसाही फी घेतलेली नाही. मानद काम करतोय, असा दावा केला होता. आता त्यांनी आपली भूमिका बदलेली दिसतेय.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.