Hanuman Chalisa Politics : तर मशिदीत हनुमान चालीसा लावून दाखवा, भाजपाचं शरद पवारांना आव्हान, मंदिरात इफ्तार पार्टीच्या आयोजनाचा वाद पेटला

पुण्यात राष्ट्रवादीकडून हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. इतकंच नाही तर हनुमान जयंतीनिमित्त उद्या मुस्लिम बांधवाकडून हनुमानाची आरती करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर आता भाजपकडून थेट शरद पवार यांना आव्हान देण्यात आलंय.

Hanuman Chalisa Politics : तर मशिदीत हनुमान चालीसा लावून दाखवा, भाजपाचं शरद पवारांना आव्हान, मंदिरात इफ्तार पार्टीच्या आयोजनाचा वाद पेटला
देवेंद्र फडणवीस, शरद पवार
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 15, 2022 | 7:28 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगांना तीव्र विरोध केल्यानंतर आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळत आहे. मशिदींवरील भोंग्यांना विरोध करताना त्यासमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. त्याचबरोबर राज यांनी शरद पवारांवर जातीवादाचा गंभीर आरोपही केलाय. राज यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. त्याचाच भाग म्हणून पुण्यात राष्ट्रवादीकडून हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं (Iftar Party) आयोजन करण्यात आलं. इतकंच नाही तर हनुमान जयंतीनिमित्त उद्या मुस्लिम बांधवाकडून हनुमानाची आरती करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर आता भाजपकडून थेट शरद पवार यांना आव्हान देण्यात आलंय.

‘मशिदीत हनुमान चालीसा लावून दाखवा’

‘शरद पवार यांनी त्यांच्या घरात मशिदीची स्थापना करुन, त्यांनी घरी इफ्तार पार्टीचं आयोजन करावं. हिंदुंच्या आस्थेवर घाला घालू नका. हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन करता तर मशिदीत हनुमान चालीसा लावून दाखवा’, असं ट्वीट करत भाजपनं थेट शरद पवारांनाच आव्हान दिलंय.

‘हिंदू धर्माच्या श्रद्धेवर घाला’

इतकंच नाही तर, नास्तिक शरद पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील साखळीपीर हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी ठेवणार आहेत. ही कोणत्या प्रकारची नास्तिकता आहे? हा सरळ हिंदू धर्माच्या श्रद्धेवर घाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर निषेध! समस्त हिंदूंनी याचा निषेध करावा, असं आवाहनही भाजपकडून करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीकडून महाआरतीचं आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातील दूधाणे लॉन्सजवळील मारुती मंदिरात आरतीचं आयोजन करण्यात आलंय. या आरतीला जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे ही आरती मुस्लिम बांधवाच्या हस्ते करण्यात येणार आहे. या आरतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरु असल्याचं पहायला मिळतंय. मनसेचं सामुहिक हनुमान चालीसा पठण आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआरती यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आता अधिक तापण्याची शक्यता निर्माण झालीय.

हनुमान मंदिरात करणार इफ्तार पार्टी!

इतकंच नाही तर राष्ट्रवादीकडून उद्या इफ्तार पार्टीचे आयोजनही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजित करण्यात आलीय. साखळीपीर हनुमान मंदिरात ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली आहे. हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लीम नागरिक आपला रोजा सोडणार आहेत. राष्ट्रवादीच्या शिवानी माळवदकर यांच्याकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

इतर बातम्या : 

Kolhapur By Election : कोल्हापूर उत्तरमधील मतदारांचा कौल कुणाला? उद्या निकाल, मतमोजणीची तयारी सुरु

‘माझ्यामध्ये किती ताकत आहे बघाच’ : खासदार नवनीत राणा यांचे किशोरी पेडणेकर यांना प्रत्युत्तर