Hardik Patel in Pune | हार्दिक पटेलांची रोहित पवारांवर स्तुतिसुमनं, शरद पवारांचं नाव घेत म्हणाले…

| Updated on: Dec 17, 2021 | 7:58 PM

हार्दिक पटेल हे दोन दिवासांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुण्यात त्यांनी शरद पवारांसह त्यांचा नातू रोहित पवारचंही कौतुक केलंय. तर दुसरीकडे भाजपवर टीका करताना मोदींवरही निशाणा साधलाय.

Hardik Patel in Pune | हार्दिक पटेलांची रोहित पवारांवर स्तुतिसुमनं, शरद पवारांचं नाव घेत म्हणाले...
Follow us on

अहमदनगर : काँग्रेस नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यादरम्यान, रोहित पवार (Rohit Pawar) यांची तारीफ केली आहे. रोहित पवारांवर बोलताना हार्दिक पटेल यांनी शरद पवारांचंही (Sharad Pawar) नाव घेतलंय. दरम्यान, दिल्लीपुढे महाराष्ट्र कधीच झुकला नसल्याचंही ते म्हणालेत.

रोहित पवारांवर स्तुतिसुमनं

रोहित पवार शरद पवारांचे नातू जरी असले, तरी त्यांनी कधीच त्यांच्या नावाचा वापर केला नाही. रोहित पवारांनी स्वतःला सिद्ध केलं. आपण पवारांचे नातू आहोत, अशा आर्विभावात ते कधीच वागले नाहीत, असं म्हणत हार्दिक पटेलांनी रोहित पवारांबाबत कौतुकोद्गार काढलेत.

दरम्यान, गुजरातला देखील कर्जत जामखेडची ओळख रोहित पवारांमुळे झाल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटलंय. गुजरातमध्ये (Gujrat) आम्ही भाजपला पाणी पाजलं असून इथं देखील तेच करुन दाखवुया, असंही हार्दिक पटेल यांनी म्हटलंय.

भाजप आणि मोदींवर हल्लाबोल

एकीकडे पवारांची तारीफ करुन झाल्यानंतर हार्दिक पटेल यांनी मोदींवर सडकून टीका केली. तसंच शरद पवार यांच्या परिवाराला दिल्लीतील लोक त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदींचं गुजरात मॉडेल खोटं असून गुजरातमधील भाजपच्या अपयशाचा पाढाही हार्दिक पटेल यांनी यावेळी वाचला.

गुजरातमध्ये 50 हजार शेतकऱ्यंनी आत्महत्या केली असल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटलंय. 50 हजार कोटीचं ड्रग्ज आढळल्याबाबत कुणीच काही बोललं नाही, यावरुनही त्यांनी सवाल उपस्थित केलेत. मोदींनी सांगितलेलं दोन कोटी रोजगार मिळतील. खरंच जर 2 कोटी रोजगार मिळाल्याचं मला कुणी दाखवून दिलं तर मी भाजपचा पट्टा घालेन, असंही खुलं आव्हान हार्दिक पटेल यांनी दिलंय.

आपल्या भाषणाच्या शेवटी हार्दिक पटेल यांनी मराठीतून भाषण करत मतदानासाठी आवाहनही केलंय. हार्दिक पटेल हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांचं मोठ्या उत्साहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं होतं.

संबंधित बातम्या – 

धुळे, अहमदनगर आणि नांदेड- वाघाळा महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी, तर सांगली-मिरज-कुपवाडासाठी 18 जानेवारीला मतदान

Oo Antava.. Oo Oo Antava : समंताच्या गाण्याचा धुमाकूळ, बेभान होऊन थिएटरमध्ये थिरकतायत चाहते…

TET Exam : कोण आहेत तुकाराम सुपे?, ओळखपत्रांमुळे बिंग फुटले; रिचेकिंगच्या नावाखाली घोटाळा