AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उमेदवारी अर्जासोबत चिल्लरचा ढिग, वेळ संपला तरी अधिकारी मोजण्यात दंग

कोल्हापूर: गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मकरंद अनासपुरेच्या सिनेमातील प्रसंग सध्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक उमेदवार अनामत रक्कम म्हणून चिल्लर घेऊन जात आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर राजाराम पन्हाळकर यांनी अनामत रक्कम म्हणून सुमारे साडेसतरा हजारांची नाणी भरली. […]

उमेदवारी अर्जासोबत चिल्लरचा ढिग, वेळ संपला तरी अधिकारी मोजण्यात दंग
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM
Share

कोल्हापूर: गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मकरंद अनासपुरेच्या सिनेमातील प्रसंग सध्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक उमेदवार अनामत रक्कम म्हणून चिल्लर घेऊन जात आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर राजाराम पन्हाळकर यांनी अनामत रक्कम म्हणून सुमारे साडेसतरा हजारांची नाणी भरली. त्यामुळे ही चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. पन्हाळकर यांनी काही नोटा आणि बाकीची चिल्लर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. अर्ज भरण्यास पंधरा मिनिटांचा वेळ शिल्लक होता, त्याचवेळी पन्हाळकर यांनी कार्यालयांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही चिल्लर मोजण्यासाठी सुमारे दीड तासांचा कालावधी लागला. दुपारी तीननंतर बंद होणारी प्रक्रिया काल मात्र पाच वाजेपर्यंत सुरू होती.

किशोर पन्हाळकर हे दिव्यांग आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या मित्रांनी काही रक्कम जमा केली. यामध्ये एक रुपये, दोन रुपये, पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. तर काही नोटादेखील पन्हाळकर यांनी भरल्या आहेत. दीड तास अनामत रकमेची मोजणी सुरू होती. त्यानंतरच पन्हाळकर यांना अनामत रकमेची पावती देण्यात आली. मात्र याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर झाली.

मकरंद अनासपुरेच्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या सिनेमातही असाच प्रसंग दाखवण्यात आला होता. तेव्हापासून निवडणुकांमध्ये अनामत रक्कम म्हणून चिल्लर भरण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!