शिवसेना आमदारांचा 6 दिवस मुक्काम, 80 रुम बूक, हॉटेल रिट्रीटचं बिल किती?

| Updated on: Nov 14, 2019 | 4:52 PM

मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती फिस्कटली. त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेसाठीच्या घडामोडींना (Hotel Retreat Bill of Shivsena MLA) प्रचंड वेग आला आणि आता नवी राजकीय समीकरणं तयार होत आहेत.

शिवसेना आमदारांचा 6 दिवस मुक्काम, 80 रुम बूक, हॉटेल रिट्रीटचं बिल किती?
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती फिस्कटली. त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेसाठीच्या घडामोडींना (Hotel Retreat Bill of Shivsena MLA) प्रचंड वेग आला आणि आता नवी राजकीय समीकरणं तयार होत आहेत. याचाच भाग म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून कमालीची काळजी घेतल्याचंही पाहायला मिळालं. शिवसेनेने आपल्या 56 आमदारांना या काळात मुंबईतच थांबण्याचे आदेश दिले. त्यांच्यासाठी मुंबईत राहण्याची खास सोयही करण्यात आली. याच खर्चाचा तपशील (Hotel Retreat Bill of Shivsena MLA) आता समोर आला आहे.

शिवसेनेने आपल्या आमदारांना सुरुवातील मुंबईतीला रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले. मात्र, तेथे काही गैरसोय होत असल्याचं म्हणत या आमदारांना 8 नोव्हेंबरला मालाड येथील द रिट्रीट हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. या आमदारांसाठी हॉटेल रिट्रीटमध्ये तब्बल 80 रुम बुक करण्यात आल्या होत्या. त्यात 56 शिवसेनेचे आमदार आणि इतर 5-6 अपक्ष आमदार यांची व्यवस्था करण्यात आली.

शिवसेना आमदारांसह समर्थक अपक्ष आमदार या ठिकाण जवळपास 5 दिवस मुक्कामी होते. 13 नोव्हेंबरला या आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपआपल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले. त्याआधी 12 नोव्हेंबरला स्वतः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. ते शिवसेना आमदारांना भेटण्यासाठी आले होते. त्यांना देखील स्वतंत्र रुम बुक न करता आधीच्या 80 रुमपैकीच एक रुम देण्यात आली.

हॉटेल रिट्रीटमध्ये एका रुमसाठी प्रतिदिवस भाडे कमीत कमी 3 हजार 500 रुपयांपेक्षा अधिकच आहे. या प्रमाणे एकूण 80 रुमचे 6 दिवसांचे भाडे 14 लाख रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे आमदार फोडाफोडापासून वाचण्यासाठी शिवसेनेने आपल्या आमदारांसाठी लाखो रुपये खर्च केल्याचं बोललं जात आहे.