Inside Story : सुरतमध्ये काँग्रेस उमेदवारानेच पक्षाचा गेम केला का? भाजपा उमेदवाराने अशी जिंकली लोकसभा निवडणूक

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. सात टप्प्याच्या मतदानानंतर 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्याआधीच सुरतमध्ये भाजपाने लोकसभेची पहिली जागा जिंकली आहे. भाजपाने हा विजय कसा मिळवला? पडद्यामागे काय घडलं? वाचा त्याची Inside Story

Inside Story : सुरतमध्ये काँग्रेस उमेदवारानेच पक्षाचा गेम केला का? भाजपा उमेदवाराने अशी जिंकली लोकसभा निवडणूक
Mukesh Dalal
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 9:28 AM

देशात लवकरच लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारात हनुमान चालीसापासून आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. या सगळ्यामध्ये अजून एक शब्द ट्रेंड होतोय, तो म्हणदे सूरत. लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या सूरतमधून भाजपाच्या विजयाचा श्रीगणेशा झाला आहे. भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांनी मतदानाआधीच बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे हे शक्य झालय. सूरतमधून भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली आहे. इथे भाजपाचा सामना काँग्रेस बरोबर होता. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यानंतर इतक्या वेगाने घडामोडी घडल्या की, 24 तासात सूरतमधील चित्र बदललं. मतदानाआधीच भाजपा उमेदवाराच्या विजयामुळे देशात राजकीय गदारोळ सुरु आहे. विरोधी पक्ष सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय.

सूरतमधील भाजपा उमेदवाराच्या बिनविरोध विजयानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी यांनी भाजपाशी हातमिळवणी केली होती का? नीलेश कुंभाणी यांनी आपल्या पक्षाला अंधारात ठेवलं का? नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 8 उमेदवारांनी अचानक माघार का घेतली? या सर्व उमेदवारांच आधी ठरलं होतं का? की हे प्रकरणच वेगळं आहे असे विविध तर्क-वितर्क, अंदाज लावले जात आहेत. भाजपाच्या या पहिल्या विजयामागची गोष्ट वेगळी आहे. ही स्क्रिप्ट आधीच लिहीली होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आधीपासून भाजपाशी सेटिंग केली होती का?

20 एप्रिलला सूरतमधील काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी यांच्या उमेदवारी अर्जामध्ये साक्षीदारांच्या सहीमध्ये गडबड असल्याची तक्रार मिळाली. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने या प्रकरणी कुंभाणी यांना 22 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर द्यायला सांगितलं. 21 एप्रिलला कलेक्टर आणि निवडणूक अधिकाऱ्या समक्ष सुनावणी झाली. त्यावेळी सही करणारे चारही साक्षीदार गायब होते. 22 एप्रिलला भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. भाजपाच्या विजयासाठी काँग्रेस उमेदवाराने आधीपासून भाजपाशी सेटिंग केली होती, असा आरोप आता होतोय.

अशा प्रकरे काँग्रेसचा चॅप्टर क्लोज

पक्षाचे कार्यकर्ते कुंभाणीचे प्रस्तावक नव्हते. नीलेश कुंभाणीने नातेवाईक जगदीया सावलियाला प्रस्तावक बनवलं होतं. त्याशिवाय बिजनेस पार्टनर ध्रुविन धामेलिया आणि रमेश पोलरा प्रस्तावक होते. फॉर्म भरताना यापैकी एकालाही निवडणूक अधिकाऱ्यासमोर आणलं नाही. त्यानंतर याच प्रस्तावकांनी बनावट स्वाक्षरीच प्रतिज्ञापत्र दिलं आणि अंडरग्राऊंड झाले. नोटीस मिळाल्यानंतरही कोणी समोर आलं नाही. अशा प्रकरे काँग्रेसचा चॅप्टर क्लोज झाला.

गुजरात पोलिसांची क्राइम ब्रांच एक्टिव

काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर बीएसपी आणि अन्य छोट्या पक्षांचे आठ उमेदवार रिंगणात होते. त्यानंतर सूरतच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घडामोडी घडल्या. अशी चर्चा आहे की, बीएसपी उमेदवार सूरतहून वडोदऱ्याला गेले होते. त्यांना शोधण्यासाठी गुजरात पोलिसांची क्राइम ब्रांच एक्टिव झाली. क्राइम ब्रांचच बीएसपी उमेदवाराला वडोदऱ्यावरुन सूरतच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन आल्याच बोललं जातय.

1984 पासून सूरतची जागा कोण जिंकतय?

फोन करुन चारही अपक्ष उमेदवारांना हॉटेलमध्ये बोलवून घेण्यात आलं. त्यांना समोरा-समोर बसवलं. त्यानंतर हे उमेदवार अर्ज मागे घ्यायला तयार झाले. सोमवारी चार वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. अशा प्रकारे भाजपाच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. गुजरातमध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत एखाद्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. 1984 पासून सूरत लोकसभेची जागा भाजपाने जिंकली आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.