राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पुण्यातले मनसे कार्यकर्ते संभ्रमात?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांच्या माध्यमातून सध्या मोदी-शाहांवर जोरदार टीका करत आहेत. शिवाय भाजपला मतदान करू नका असं आवाहनही केलंय. राज यांच्या राजकीय खेळीमुळे मनसे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. मनसेची जरी भाजपविरोधी भूमिका असली तरी मनसे कार्यकर्ते काँग्रेसच्या किती जवळ जातील याबाबत राजकीय वर्तुळात सांशकता व्यक्त केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज […]

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पुण्यातले मनसे कार्यकर्ते संभ्रमात?
Follow us on

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांच्या माध्यमातून सध्या मोदी-शाहांवर जोरदार टीका करत आहेत. शिवाय भाजपला मतदान करू नका असं आवाहनही केलंय. राज यांच्या राजकीय खेळीमुळे मनसे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. मनसेची जरी भाजपविरोधी भूमिका असली तरी मनसे कार्यकर्ते काँग्रेसच्या किती जवळ जातील याबाबत राजकीय वर्तुळात सांशकता व्यक्त केली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी आणि अभ्यासपूर्ण भाषण याची जरी चर्चा होत असली तरी मनसे कार्यकर्त्यांना ती फारशी रुचलेली दिसत नाही. पुणे जिल्ह्यात राज यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत गेल्या वेळी 29 नगरसेवक होते. मात्र आज परिस्थिती फार वेगळी आहे. कार्यकर्ते राज यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करत असले तरी त्याला समर्थन किती याबाबत सांगणं कठीण असल्याचं विश्लेषकांचं मत आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून मनसेच्या उमेदवाराने 94 हजार मतं घेतली होती. ती मतं आता आमच्या पारड्यात पडतील असा विश्वास काँग्रेसला वाटतो.

मनसेची ही सर्व मतं त्यावेळी काँग्रेसविरोधी होती आणि आजही ती काँग्रेस विरोधीच आहेत. त्यामुळे त्याचा फायदा हा काँग्रेसला कधीच होणार नसल्याचं भाजपकडून सांगितलं जातंय.

मनसे कार्यकर्ता हा मूळचा शिवसैनिक आहे. त्यामुळे तो भाजप-शिवसेना विरोधी जाणं अवघड असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. मात्र राज यांची हीच भूमिका कायम राहिल्यास त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. राज यांच्या सभा सध्या आघाडीला उर्जितावस्था देण्याचं काम करत आहेत. मात्र ही ऊर्जा तात्पुरती असल्याचं चित्र आहे. हीच ऊर्जा कायम टिकवायची असल्यास राज यांना आघाडीत स्थान देण्याची गरज असल्याचंही जाणकार सांगतात.

एकूणच मुंबई असो किंवा पुणे, मनसे कार्यकर्ता काँग्रेसला किती मदत करणार याबाबत साशंकता आहे. मुंबईत संजय निरुपमांसारखा मनसेचा कट्टर विरोधीक उमेदवार आहे, तर पुण्यातही काँग्रेसला मदत करणं मनसे कार्यकर्त्यांना किती पटेल याबाबत शंका व्यक्त केली जाते. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांचा संभ्रम कायम आहे.