आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

वरळीमधून मोठी बातमी समोर येत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश
| Updated on: Oct 02, 2022 | 12:56 PM

गिरिष गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई : वरळीमधून (Worli) मोठी बातमी समोर येत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघातील शेकडो शिवसैनिकांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्याने हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत. यापूर्वी देखील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उठवानंतर शिवसेनेत सुरू झालेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न देखील होत आहेत. मात्र अद्याप तरी यश येताना दिसून येत नाहीये.

आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ

वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यांना याच मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. आज शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत.

‘धक्का तर आणखी बाकी’

दरम्यान यावर शिंदे गटाचे नेते किरण पावसकर  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा धक्का नाहीये, धक्का तर आणखी बाकी आहे. अजून अनेकांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. हाच खरा जनतेचा मुख्यमंत्री अशी भावना नागरिकांची आहे. आज पहिल्यांदाच महापालिका कर्मचाऱ्यांना कोणतंही आंदोलन न करता त्यांचा हक्क मिळाला. कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री आपले वाटतात असं पावसकर यांनी म्हटलं आहे.