प्रतापराव जाधवांच्या शंभर कोटींच्या आरोपाला किशोरी पेडणेकरांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाल्या आम्ही…

प्रतापराव जाधव यांनी दर महिन्याला मातोश्रीवर शंभर कोटी जायचे असा आरोप केला आहे. या आरोपाला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चोख प्रत्युत्तर दिले आहे.

प्रतापराव जाधवांच्या शंभर कोटींच्या आरोपाला किशोरी पेडणेकरांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाल्या आम्ही...
Image Credit source: social media
अजय देशपांडे

|

Oct 02, 2022 | 11:58 AM

मुंबई:  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उठवानंतर शिवसेनेत (shiv sena) फूट पडली आहे. सुरुवातीला शिंदे गटांच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप करणे टाळले. मात्र आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटातील नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करण्यात येत आहेत. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी आता उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये नेऊन दिले जात होते. सचिन वाझे हेच मातोश्रीवर खोके घेऊन जात होते असा आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे. प्रतापराव जाधव यांच्या या टीकेला आता शिवसेना नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नेमकं काय म्हणाल्या पेडणेकर

आता आरोपाचा कंटाळा यायला लागला आहे. खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले जातात. मात्र त्यात खरच तथ्य आहे का हे शोधलं पाहिजे. आमचं काम आम्ही करत आहोत. आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ असं किशोरी  पेडणेकर यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे मात्र त्यांनी दसरा मेळाव्यावर बोलंण टाळलं. त्यांना दसरा मेळाव्याबाबत विचारले असता आमचा दसरा मेळावा आनंदातच होणार आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

प्रतापराव जाधवांचा नेमका आरोप काय?

प्रतापराव जाधव  यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये नेऊन दिले जात होते. सचिन वाझे हेच मातोश्रीवर खोके घेऊन जात होते असा आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें