माझ्या ‘त्या’ विधानामुळे अजित पवारांवर IT छापे, शरद पवारांचा सोलापुरात दावा

| Updated on: Oct 08, 2021 | 3:42 PM

"उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडण्याचं पाप भाजप सरकारने केलं. हा प्रकार म्हणजे जालियनवाला बाग हत्यांकाडासारखा होता. मात्र जालियनवालाचा उल्लेख केलेला रुचाला नाही हे एका सत्ताधारीने मला सांगितले. म्हणूनच छापेमारी सुरु आहे. पण छापा मारा, काही करा, सामाजिक बांधीलकी कधीच सोडणार नाही" असं शरद पवार म्हणाले.

माझ्या त्या विधानामुळे अजित पवारांवर IT छापे, शरद पवारांचा सोलापुरात दावा
sharad pawar
Follow us on

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad) हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं. “उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडण्याचं पाप भाजप सरकारने केलं. हा प्रकार म्हणजे जालियनवाला बाग हत्यांकाडासारखा होता. मात्र जालियनवालाचा उल्लेख केलेला रुचाला नाही हे एका सत्ताधारीने मला सांगितले. म्हणूनच छापेमारी सुरु आहे. पण छापा मारा, काही करा, सामाजिक बांधीलकी कधीच सोडणार नाही” असं शरद पवार म्हणाले.

शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष

हे सरकार टिकवायचे आहे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाढवायचा आहे. हे राज्य चुकीच्या हातात द्यायचं नाही. त्यांचा (भाजपचा) अनुभव चांगला नाही. या देशातील 60 टक्के पेक्षा लोक काळ्या मातीचे इमान राखतो. शेतकऱ्याचे हिताचे समर्थन आहे, त्याला आपली साथ आहे. शेतीमालाच्या किमतीसंबधी दिल्लीच्या बॉर्डरवर एक वर्ष आंदोलन आहे. शेतकरी रस्त्यावर घरदार सोडून बसलाय. एक वर्षांपासून आंदोलन मात्र कुणी ढुंकून पाहत नाही, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.

भाजपच्या नेत्याच्या गाड्याने शेतकऱ्यांना चिरडलं. त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांची जागा दाखवण्याशिवाय गत्यंतर नाही. भाजपची नीती ही शेतकरी विरोधी आहे.

अनेक लोक सोडून गेले

“यापूर्वी मी कोरोनाचे संकट होते त्यावेळी आलो होतो. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पीकपाणी उद्ध्वस्त झाले. महाराष्ट्रातील सहकारी अडचणी आहेत, त्यावेळी मी जाणून घेण्यासाठी दौरा करतो. त्याची सुरुवात मी सोलापूरपासून करतो. अनेक लोक सोडून गेले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या बाबतीत अनेक लिखाण होत होते. जे आम्हाला सोडून गेले त्यांची जनतेने सुट्टी केली. आपल्याला मोठ्या प्रमाणात यश आले. पण सरकार बदलण्याची स्थिती नव्हती. रोज आम्ही बघत होतो, आज होईल, उद्या होईल असे वाटत होते. आम्ही थंड डोक्याने बसलो होतो. कारण जाऊन जाऊन कुठे जाणार हे आम्हाला माहीत होते. मुख्यमंत्री कोणाला करायचे हा प्रश्न होता. महाराष्ट्रात तिन्ही पक्षाचे मिळून चांगले काम करत आहेत. मात्र सगळ्यात नागरिकांचे पक्ष सोडवतो तो राष्ट्रवादी, असं शरद पवार म्हणाले.

ऊस घातला की साखर तयार झाली असं होत नाही

शरद पवारांनी काय केले असा प्रश्न एकाने केला. मी साखर कारखानदार नाही. तुमचे मत असेल तर मी त्यासाठी आग्रह धरेन. एकरकमी रक्कम द्या असा एक शब्द निघालाय. ऊस गेला की रक्कम द्या असं म्हणतात. ऊस घातला की साखर तयार झाली आणि ती विकली जाते असे होत नाही. कारखान्यात वर्षानुवर्षे साखर पडून राहते. गुजरातमध्ये पहिला, दुसरा, तिसरा हप्ता केल्यामुळे शेतकऱ्यांना फायद्याचा. एक रकमीमध्ये शेतकऱ्याचे हीत किती आहे हे पहिले पाहिजे 12 हजार कोटींचा दंड साखर कारखान्यांना भरायला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

साखर कारखानादारी उद्ध्वस्त होईल

या नोटिसा कश्यासाठी? सहकारी साखर कारखानादारी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त पैसे दिले आहेत. उत्तर प्रदेशात जास्त पैसे दिल्यावर टॅक्स नाही. इकडे मात्र टॅक्स आणि दंड. हा काय न्याय आहे का?

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांबाबत जे झालं ज्या दिवशी झालं त्या दिवशी मी दिल्लीत होतो. मला तिकडे जाऊ दिले नाही. गाड्या घालणारे समाजद्रोही. जालियनवाला बागसारखे हत्याकांड करुन 8 जणांची हत्या झाली, तिथून आलो.

पुण्यातून फोन आले की आपल्याकडे पाहुणे आले आहेत. माझ्याकडे आले नाहीत. अजित पवारांच्या बहिणींच्या घरी गेले. अजून त्यांच्याच घरी आहेत अशी माहिती. पाहुणचार घ्या, काही हरकत नाही.

VIDEO : शरद पवार यांचं भाषण 

संबंधित बातम्या  

IT raid on Ajit Pawar, Parth Pawar Live : पुण्यात समर्थकांची घोषणाबाजी, अजित पवार भेटीसाठी दाखल

अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन, छापेमारीचा तीव्र निषेध