मी ‘सामना’ वाचत नाही, सूर्यावर थुंकू नका, राहुल गांधींच्या भेटीपूर्वी नाना पटोलेंची रोखठोक प्रतिक्रिया

| Updated on: Jul 20, 2021 | 1:39 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra congress president Nana Patole) राजधानी दिल्लीत आहेत. नाना पटोले दुपारी 3:30 वाजता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भेटणार आहेत.

मी सामना वाचत नाही, सूर्यावर थुंकू नका, राहुल गांधींच्या भेटीपूर्वी नाना पटोलेंची रोखठोक प्रतिक्रिया
संजय राऊत आणि नाना पटोले
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra congress president Nana Patole) राजधानी दिल्लीत आहेत. नाना पटोले दुपारी 3:30 वाजता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भेटणार आहेत. त्याआधी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘सामना’ दैनिकातून काँग्रेसच्या स्थितीबाबत (Shiv Sena Saamana) केलेल्या भाष्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. नाना पटोले म्हणाले, “सामनावर मी कोणती ही प्रतिक्रिया देत नाही कारण मी सामना वाचत नाही. कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जातं असेल तर त्याचा विचार आम्हला एकदा करावा लागेल”

आम्हला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जो थुंकेल त्याच्यावरच पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा नाना पटोलेंनी दिला.

‘सामना’मध्ये नेमकं काय म्हटलंय?

काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? असा सवाल सामना दैनिकात करण्यात आला आहे. याशिवाय काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम असल्याचं आजच्या सामना अग्रलेखात (Saamana Editorial) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले राहुल गांधींना भेटणार

दरम्यान, नाना पटोले दुपारी 3:30 वाजता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटणार आहेत. काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे सुद्धा बैठकीला उपस्थित असतील. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होत असून, या बैठकीत संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार आहे. नाना पटोले यांच्या दोन बैठका आहेत. एक बैठक AICC ला आहे नेत्यांबरोबर तर दुसरी बैठक राहुल गांधी यांच्याबरोबर आहे.

VIDEO : नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या 

काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम, अग्रलेखातून राऊतांचा काँग्रेसशी ‘सामना’!

Pegasus Spyware : नाना पटोले यांचाही फोन टॅप, बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप