AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करोडोचे आमिष, पण फुटले नाहीत, आज जाहीर सभेत शब्दच दिला, राजाभाऊ वाजेंच्या त्या शब्दांनी शिवसैनिकही भारावला

खासदार राजाभाऊ वाजे यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष न सोडल्याने त्यांचे पक्षातील स्थान आणि मान वाढला आहे. यात नाशिक येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याला उत्तर देताना राजाभाऊ भावूक झाले.

करोडोचे आमिष, पण फुटले नाहीत, आज जाहीर सभेत शब्दच दिला, राजाभाऊ वाजेंच्या त्या शब्दांनी शिवसैनिकही भारावला
MP Rajabhau Waje
| Updated on: Jun 28, 2026 | 9:12 PM
Share

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे ९ पैकी ६ खासदार एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आणि त्यानंतर त्यांनी रितसर शिवसेना पक्षात प्रवेश केला. या सहा खासदारांच्या विरोधात आता उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदार संघात जाऊन आव्हान दिले आहे. यात उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवणाऱ्या खासदार राजाभाऊ वाजे यांचे शिर्डीत मागे झालेल्या स्वागताने प्रसारमाध्यमात ते प्रचंड प्रसिद्ध झाले. राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील वाजे यांचा तो रेल्वे स्थानकावरील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात गुलालात माखलेले वाजे यांना पंचारतींनी शिवसैनिक रणरागिणी ओवाळताना दिसत आहे. आज खासदार राजाभाऊ वाजे यांचा नाशिकमध्ये सत्कार झाला.

या सत्काराला उत्तर देताना राजाभाऊ वाजे म्हणाले की माझा सत्कार करायचा विषय आला, तेव्हा मी नकार दिला होता. निवडणूक झाल्यावर पण हा विषय आला होता. परंतु मी तेव्हाही विनम्रपणे नकार दिला होता. राजकीय परिस्थिती कशी निर्माण झाली हे आपल्याला माहिती आहे. वेगळी वाट धरावी हा विचार माझ्या मनात कधीही आला नव्हता. ज्या पक्षाने आमदार केलं, खासदारकी दिली, त्या पक्षाबरोबर प्रामाणिक न राहून काय केलं पाहिजे ? हा प्रश्न मी सर्वांसमोर मांडतो आहे.

राजाभाऊ वाजे यावेळी म्हणाले की मला पद, पैसा सगळं दिलं असतं, पण हे प्रेम मिळालं नसतं. मी वेगळं काही केलं नाही, सरळ होतं ते केलं म्हणून तुम्ही सत्कार ठेवला. मी तुमची प्रतारणा करणार नाही, पक्षाने मला तालुक्याला सर्व काही दिलं आहे. दिघोळे साहेब, कोकाटे साहेब यांना याच पक्षाने उमेदवारी दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदही याच पक्षाने दिले मी विशेष काही केलं नाही, विशेष झाल्यावर काय होईल ? असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

जर काही न रता एवढा उदोउदो करत आहेत. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत पक्षासोबत राहील. जे माझ्या सोबत होते निघून गेले, त्यांच्यावर मी नाराज नाही. जे सोबत आहे ते सोबत राहतीलच. माझे जे विरोधक आहेत ते फक्त राजकीय आहेत. माझ्या निवडणुकीत जे पुढे होते ते सगळेच आहेत असे राजाभाऊ यावेळी म्हणाले.

चार दिवसात सगळा बॅकलॉग भरून निघाला

बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने मला हे सगळं दिलं आहे. मी प्रसिद्धी पासून लांब होतो, चार दिवसात सगळा बॅकलॉग भरून निघाला आहे. इतर सहा जणांना आता ते ( मीडिया ) प्रश्न विचारतील असाही टोला राजाभाऊ वाजे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या खासदारांना लगावला. मी उद्धव साहेबांसोबत होतो आणि त्याच्या सोबतच राहील. राज्यातील आणि देशातील सर्व मीडियाशी मी बोललो आहे. आता माझ्याकडे बोलण्यासारखे काही उरले नाही. माझा बॅकलॉग सगळा भरुन निघाला आहे. तुमचे आशीर्वाद सोबत राहू द्या,  तुमची प्रतारणा होणार नाही हा शब्द देतो असे भावूक होत राजाभाऊ यांनी सांगितले.

मी एकच काम केलं राजाभाऊ यांना…- प्रकाश वाजे

आज राजाभाऊ यांचा सत्कार होत आहे, मात्र माझा सत्कार का आहे ? आजही मला कळत नाही.  मी एकच काम केलं राजाभाऊ यांना सांगितलं की आहे तिथे ठाम रहा. कोणत्याही लोभाला बळी पडू नका. आपल्या कुटुंबाला, कुळाला डाग लागणार नाही. आणि मी सांगितले तेच राजाभाऊ यांनी केले त्यामुळे मला समाधान आणि आनंद आहे असे राजाभाऊ यांचे वडील प्रकाश वाजे यावेळी म्हणाले.

येथे पाहा व्हिडीओ –

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?