देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील, तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा : बच्चू कडू

| Updated on: Nov 07, 2019 | 5:09 PM

जर देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि यावर तोडगा काढावा, असा टोलाही बच्चू कडू यांनी (Bacchu kadu on Cm devendra fadnavis) लगावला.

देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील, तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा : बच्चू कडू
Follow us on

मुंबई : “शिवसेनेत सर्व वाघाचे बछडे आहे. त्यामुळे शिवसेना का घाबरेल” अशी प्रतिक्रिया शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी (Bacchu kadu on Cm devendra fadnavis) दिली. उद्या काही जण शरद पवारही शिवसैनिक आहेत असं म्हणतील. जर देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि यावर तोडगा काढावा, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.” शिवसेनेने मातोश्रीवर आयोजित केलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीदरम्यान माध्यमांशी बोलतानाही ही प्रतिक्रिया (Bacchu kadu on Cm devendra fadnavis) दिली.

“शिवसेना बकरी होऊन नाही तर वाघाचे बछडे होऊन समोर जात आहे. वाघाला फोडण्याची ताकद सध्या तरी कोणाकडे नाही. असेही बच्चू कडू म्हणाले. शिवसेना भाजपमध्ये 50-50 हा कळीचा मु्दा बळला आहे. याचे पुरावे शिवसेनेकडे आहेत. त्यांनी जर हे वचन दिले असेल, तर मग त्यात मुख्यमंत्रीपदही येते. त्यामुळे भाजप जर बोलल्याप्रमाणे करत नसेल, तर ती फसवतं आहे, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली.”

“जर भाजपकडून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. तर मग मुख्यमंत्री शिवसेनेचा असायला काहीच हरकत नाही. भाजपला एवढं ताणून ठेवण्याची गरज नव्हती. जे काही 50-50 चं ठरलं आहे, ते त्यांनी द्यावे असेही बच्चू कडू (Bacchu kadu on Cm devendra fadnavis) म्हणाले.”

“मी शेतकऱ्यांसाठी मातोश्रीवर आलो आहे. युतीचा पेच सोडवण्याइतका आमचा आकडा मोठा नाही. राजकारणात फोडाफोडी होत असते, त्यामुळे शिवसेनेला घाबरायची गरज नसल्याचेही ते म्हणाले.”

“कोण मुख्यमंत्री होणार कोण मंत्री होणार याविषयी सध्या महत्त्वाचा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत जाहीर होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजपने मोठा भाऊ समजून शिवसेनेला पुढाकार समजून मुख्यमंत्री पद द्यावे, असेही ते म्हणाले.”

“तुम्हाला जी काही तोडफोड करायची असेल ती नंतर करा. पण पहिला शेतकरी वाचणं महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत सरकारची स्थापना होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तर राज्यपालांकडे मोर्चा काढू अशा इशारा देखील बच्चू कडू यांनी यावेळी दिला. माझ्याासाठी शेतकरी महत्त्वाचा आहेत. त्यानंतर पक्षाचे पाहू असेही बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितले.”