Uddhav Thackeray: हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा, उद्धव ठाकरेंचे एकनाश शिंदेंना थेट आव्हान, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बंडखोरांना वापरता येणार नाही. हिंमत असेल तर स्वताच्या बापाच्या नावाने मते मागा, असे आव्हान त्यांनी एकनाथ शिंदेंना दिले आहे. त्यांच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे

Uddhav Thackeray: हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा, उद्धव ठाकरेंचे एकनाश शिंदेंना थेट आव्हान, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे
मुख्यमंत्र्यांनी कालपर्यंत समाजावलं आज थेट सुनावलं, प्रेमसंवाद ते वाघाची डरकाळी, बदलेली बॉडी लॅन्ग्वेज काय सांगते?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 25, 2022 | 3:10 PM

मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांनी आजच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बंडखोरांना वापरता येणार नाही. हिंमत असेल तर स्वताच्या बापाच्या नावाने मते मागा, असे आव्हान त्यांनी एकनाथ शिंदेंना दिले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे

  1.  हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा – उद्धव ठाकरे
  2.  आधी नाथ होते, आता दास झाले – उद्धव ठाकरे
  3.  बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घ्यावा- उद्धव ठाकरे
  4.  बाळासाहेब ठाकरे यांचे नाव त्यांना वापरता येणार नाही- उद्धव ठाकरे
  5. शिवसैनिकांचे माझ्यावर थोडं जास्त प्रेम आहे, कारण मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे.

 

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील पाच महत्त्वाचे ठराव

  1. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरेंकडे
  2.  मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नाही
  3. आगामी महापालिका निवडणुकीत भगवा फडकणार
  4.  उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास
  5. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं नाव कुणाला वापरता येणार नाही.