AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नार्वेकर यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा वाढवली, महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्याचा शिंदे सरकारला खोचक टोला

महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र दुसरीकडे मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

नार्वेकर यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा वाढवली, महाविकास आघाडीतील 'या' नेत्याचा शिंदे सरकारला खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2022 | 12:58 PM
Share

मुंबई :  महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे राज्य सरकारने महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केली आहे. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची सुरक्षा वाढवण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. यावरून काँग्रेसचे (Congress) नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे. मिलिंद नार्वेकर  यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असेल, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

सतेज पाटील यांनी नेमकं काय म्हटलं?

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावरून राज्य सरकारवर सध्या जोरदार टीका सुरू आहे. एकीकडे राज्य सरकारने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. यावरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा यामुळेही वाढवली असेल, की त्यांना खरच धोका असेल. दुसरं म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते कुठे जातात? कोणाला भेटतात हे कळण्यासाठी देखील त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असेल असं सतेज पाटील यांनी म्हलटलं आहे.

नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा

काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.  त्यातच नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानं  चर्चेला उधाण आलं. आता पुन्हा एकदा नार्वेकर यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्यानं चर्चेला सुरुवात झाली आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.