मुंबई पोलीस अनमोल बिष्णोईला घाबरत आहेत का ? झिशान सिद्दीकी यांचा सवाल
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जवळपास एक वर्षे पूर्ण होत आले असले तरी या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नसल्याचे त्यांचे पूत्र झिशान सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासावरुन त्यांचे पूत्र आमदार झिशान सिद्दीकी नाराज झाले आहेत. त्यांनी या प्रकरणात कुख्यात गुंड अनमोल बिष्णोई याची चौकशी करुन त्याला मुंबई पोलिस का विचारत नाहीत की यामागे नक्की कोण मास्टरमाईंड आहे असा सवाल झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. मुंबई पोलीस अनमोल बिष्णोईला घाबरत आहे का असा सवालही झिशान सिद्दीकी यांनी केला आहे.
अनमोल बिष्णोई याला मुंबई आणा आणि विचार की बाबा सिद्दीकी यांची हत्या कोणी करायला लावली हे विचारा अशी मागणी त्यांचे पूत्र झिशान सिद्दीकी यांनी केली आहे. मुंबई पोलिस सध्या खूप तर्क हीन उत्तरं देत आहेत अशी नाराजी सुद्धा झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली आहे. मुंबई पोलिस त्याला घाबरत आहे का असा सवालही त्यांनी केला आहे. या प्रकरणात अनमोल बिष्णोई याची चौकशी करुन मास्टरमाईंडपर्यंत का पोहचत नाहीत असाही सवाल झिशान सिद्दीकी यांनी केला आहे.
आपण मुंबई पोलिसांना केवळ इतकेच विचारले की अनमोल बिष्णोईला आणण्यासाठी तुम्ही काय ? इनिशिटीव्ह घेतला तर मुंबई पोलिसांचे उत्तर हे आले की आम्ही व्हीक्टीमच्या मुलाला हे सांगू शकत नाही. अनमोल बिष्णोई यांना अलर्ट केले जाईल, म्हणजे मी तुरुंगात जाऊन अनमोल बिष्णोई याला अलर्ट करणार काय ? असा सवालही झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. मुंबई पोलिस लॉजिकल उत्तरं देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या गेल्यावर्षी 12 ऑक्टोबर वांद्रे – खेरवाडी येथे हत्या झाली होती. अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर अंधाधुंद फायरिंग करीत त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले होते.
दोघा जणांना ताब्यात घेतले
बाबा सिद्दिकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या खेरवाडी सिग्नलजवळ असलेल्या कार्यालयाकडे जात असताना बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघा अज्ञातांकडून गोळीबार केला होता.या प्रकरणात बिष्णोई गँगवर आरोप झाला होता. या प्रकरणात निर्मल नगर पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले होते. यातील एक आरोपी हरियाणा आणि दुसरा आरोपी उत्तरप्रदेशातला असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई क्राईम ब्रँच या घटनेचा तपास करीत आहे.
