नवीन वर्षाच्या सुरुवातीला भाजपचा नवा कार्यक्रम, जे पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांचं आयोजन

| Updated on: Jan 01, 2023 | 3:57 PM

2024 च्या निवडणुकीसाठी भाजप तयार, भाजपची रणनिती काय? वाचा...

नवीन वर्षाच्या सुरुवातीला भाजपचा नवा कार्यक्रम, जे पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांचं आयोजन
Follow us on

चंद्रपूर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) सज्ज आहे.त्यासाठीचं त्यांनी नव्या मिशनची घोषणा केली आहे. ‘मिशन 144’ ची घोषणा त्यांनी केली आहे. या ‘मिशन 144’ ची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा चंद्रपुरातून (J P Nadda on Chandrapur Daura) करणार आहेत. यासाठी उद्या म्हणजे 2 जानेवारी ला जे पी नड्डा चंद्रपूर दौऱ्यावर येत आहेत.

जे पी नड्डा चार्टर्ड विमानाने सकाळी 11 वाजता चंद्रपुरच्या मोरवा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सिव्हिल लाईनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे.

सभेनंतर नड्डा भाजपच्या ‘लोकसभा टीमशी’ एका बैठकीत संवाद साधून औरंगाबादसाठी रवाना होतील.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित असतील.

लोकसभा निवडणुकीआधी नड्डा यांचा हा दौरा महत्वपूर्ण आहे. या दौऱ्यासाठी चंद्रपुरात खास तयारी करण्यात आली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या सर्व ठिकाणी भाजपने लक्ष केंद्रित केलं असून त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या दौऱ्याकडे बघितलं जात आहे.

याआधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा दौरा करून केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी आणि भाजपच्या पक्षसंघटनाविषयक विविध मुद्द्यांची हाताळणी केली होती.

आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा चंद्रपुरात येत आहेत. चंद्रपूर भाजपच्या वतीने नड्डा यांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे.