AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा फोन, तरीही ‘तो’ पदाधिकारी पळाला, जळगावच्या दूध संघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट

दूध महासंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. आज उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्हांचे वाटप केले जाईल. 

अजितदादांचा फोन, तरीही 'तो' पदाधिकारी पळाला, जळगावच्या दूध संघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट
Image Credit source: social media
| Updated on: Nov 29, 2022 | 7:36 AM
Share

अनिल केऱ्हाळे, जळगावः जळगाव दूध महासंघ  निवडणूक (Jalgaon Milk Federation) जवळ येतेय, तशा मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिंदे-भाजप पॅनलचे संजय पवार (Sanjay Pawar) आणि दिलीप वाघ यांच्याबाबतीत तर  कहरच झाला. संजय पवार यांनी आधी बंद दाराआड एकनाथ खडसेंसोबत चर्चा झाली. नंतर अजित पवार (Ajit Pawar) यांना फोनवर शब्दही दिला. त्यांतरही ते पळून गेले. एकनाथ खडसे यांनीच हा आरोप केलाय.  शिंदे गटाकडे गेलेल्या संजय पवार यांच्या शिंदे गटाकडे पळून जाण्याची मोठी चर्चा सध्या रंगली आहे. तर दुसरीकडे दिलीप वाघ यांनाही गळाला लावण्यात गिरीश महाजन यांना यश आलंय. उमेदवारी अर्ज माघारीच्या काही मिनिटं आधी ते बिनविरोध निवडून आले.

काय घडलं?

जळगाव दूध महासंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. काल 28 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती. महाविकास आघाडी आणि शिंदे-भाजप पॅनलच्या महत्त्वाच्या उमेदवारांची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन्हीकडून जोर लावण्यात आला. यात खेचाखेचीत शिंदे गटाने बाजी मारल्याचे दिसून आले.

संजय पवार पळाले?

संजय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. मात्र जिल्हा दूध संघाची निवडणूक ते शिंदे-भाजप पॅनलकडून लढवत होते. एकनाथ खडसे यांच्या आरोपांनुसार संजय पवार यांनी मला बिनविरोध करा, मी तुमच्याकडे येतो, अशी अट टाकली. यानंतर अजित पवार यांच्याशी फोनवर चर्चाही केली. पण तुमचा हा निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर करा, असे खडसेंनी सांगितलं. मात्र त्यानंतर संजय पवार पळून गेले, परत आलेच नाहीत, असा आरोप खडसे यांनी केला. दरम्यान, मी शिंदे-भाजपकडूनच निवडणूक लढवणार होतो. तडजोडीची अट मविआनेच टाकली होती. मी पळून गेलेलो नाही, शब्द पाळणारा आहे, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली. दरम्यान या वर्तणुकीनंतर संजय पवार यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

पाहा एकनाथ खडसे काय म्हणाले?

दिलीप वाघही शिंदे गटाच्या गळाला

तर पाचोरा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनीही दगा दिला. दिलीप वाघ यांना शिंदे-भाजपा पॅनलच्या गळाला लावण्यात गिरीश महाजन यांना यश आले. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना ही घडामोड झाली. पाचोरा मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी माघार घेतली. तर दिलीप वाघ यांचा बिनविरोध विजय झाला.

एकूणच दूध महासंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. आज उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्हांचे वाटप केले जाईल.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.