
जळगाव येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले शरद पवारांच्या कामाचे कौतुक केले. “बाबासाहेब आंबेडकरांचे मराठवाडा विद्यापीठाला दिलेले नाव, मंडल आयोग आल्यानंतर तो लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतला होता. त्याचा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमात करावा लागेल” असे सुनील तटकरे यांनी म्हटलं. जळगावातील पक्षाच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर मंत्रीपदाबाबतची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, तेव्हा पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले. याबाबतचा किस्सा सांगताना आमदार अनिल पाटील पुन्हा मंत्री पदाबाबतची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. “त्यादिवशी 2 जुलै 2023 ची तारीख होती, त्यामुळे काल सुद्धा 2 जुलै ही तारीख होती, मी तटकरे साहेबांसोबत होतो. त्यामुळे तटकरे साहेब आता बोलतील, तेंव्हा बोलतील अशी मी वाट पाहत होतो” असं आमदार अनिल पाटील म्हणाले.
त्यांनीच मला मंत्री पदाबद्दल कानात सांगितले
‘माझ्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, पण जाहीर करा असे म्हणणार नाही’, या शब्दात आमदार अनिल पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोर बैठकीत मंत्रिपदाबाबतची इच्छा बोलून दाखविली आहे. “त्यादिवशी रात्री 12 वाजता दादांच्या बंगल्यावर पोहोचलो.. नाश्ता केला…तटकरे साहेब…समोरुन आले..आपल्याला मंत्री मंडळात शपथविधीसाठी जायचे आहे…असे त्यांनी सांगितले. सर्वात आधी मला मंत्री पदाबद्दल सांगणारे सुनील तटकरे साहेब होते, त्यांनीच मला मंत्री पदाबद्दल कानात सांगितले, त्यानंतर आम्ही शपथविधीसाठी गाड्यांमध्ये गेलो होतो” असं आमदार अनिल पाटील म्हणाले.
जाहीर करा….असे मी बोलणार नाही
“काल पुन्ह्वा 2 जुलै होती…मी कोट घालून गेलो, 12 वाजले, तटकरे साहेब आता बोलतील, केंव्हा बोलतील….अशी मी वाट पाहत होतो.. आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, पण जाहीर करा….असे मी बोलणार नाही” असे यावेळी भाषणात आमदार अनिल पाटील म्हणाले.