AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’ रिलीजपूर्वीच रचला इतिहास, प्रीमियर शोची कमाई थक्क करणारी, आकडा ऐकून…

'धुरंधर 2' ने प्रीमियर शोमधूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पेड प्रीव्यूमधूनच इतिहास रचला आहे. कमाई पाहून सर्वच थक्क.

'धुरंधर 2' रिलीजपूर्वीच रचला इतिहास, प्रीमियर शोची कमाई थक्क करणारी, आकडा ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 19, 2026 | 8:06 AM
Share

Dhurandhar 2 Box Office: डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या रणवीर सिंगच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडले होते. त्या जबरदस्त यशानंतर प्रेक्षक त्याच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 18 मार्च 2026 रोजी ‘धुरंधर 2’ ने पेड प्रीव्यू शोद्वारे थिएटरमध्ये एंट्री घेतली आणि पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना अ‍ॅक्शन, ड्रामा आणि मनोरंजनाचा दमदार अनुभव दिला.

काही विलंब, पोस्टपोनमेंट आणि शो कॅन्सलेशननंतर बुधवारी संध्याकाळी देशभरात या चित्रपटाचे पेड प्रीव्यू शो सुरू झाले. सुरुवातीलाच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘धुरंधर 2’ने केवळ प्रीमियर शोमधूनच भारतात तब्बल 44 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर एकूण कलेक्शन 52.71 कोटी रुपये इतके झाले आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटाने आपल्या पहिल्या भागाचा रेकॉर्डही मोडला आहे. ‘धुरंधर’ने जिथे 28 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती, तिथे सिक्वेलने प्रीव्यूमधूनच त्यापेक्षा मोठी कमाई करून नवीन इतिहास रचला आहे.

सर्वात मोठा पेड प्रीव्यू शो

‘धुरंधर 2’चा प्रीमियर भारतातील सुमारे 6000 स्क्रीनवर 9000 शोसह करण्यात आला होता. जो आतापर्यंतचा सर्वात मोठा पेड प्रीव्यू रिलीज मानला जातो. तिकिटांचे दर सरासरी 400 रुपयांपेक्षा जास्त असूनही प्रेक्षकांची मागणी प्रचंड होती आणि बहुतांश शो आधीच हाऊसफुल झाले होते.

या चित्रपटाने पेड प्रीव्यू कलेक्शनमध्ये नवा ऑल-टाइम रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. 2024 मध्ये ‘स्त्री 2’ने केलेल्या 10 कोटींच्या विक्रमाला तीनपट मागे टाकत ‘धुरंधर 2’ने 44 कोटींचा टप्पा गाठला. तसेच, पवन कल्याणच्या ‘ओजी’ 25 कोटी चा रेकॉर्डही मोडीत काढला.

कलाकार आणि रिलीज

या स्पाय थ्रिलरमध्ये रणवीर सिंगसोबत आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांची महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरात पूर्ण क्षमतेने प्रदर्शित होत आहे.

पहिल्या भागाने जगभरात 1300 कोटींची कमाई केली होती आणि त्याच्या प्रचंड यशामुळे ‘धुरंधर 2’कडूनही ब्लॉकबस्टर ओपनिंगची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी