देवेंद्र फडणवीस शतरंज का बादशाह, जालन्याच्या जल आक्रोश मोर्चात रावसाहेब दानवेंची फुल्ल बॅटींग

| Updated on: Jun 15, 2022 | 3:41 PM

जालाक्रोश मोर्चाला संबोधित करताना, ' आता प्रत्येक निवडुकीत फटके मारल्या शिवाय गप्प बसायचं नाही. आपलं सरकार असता तर समृध्दी महामार्ग सुरू झाला असता. पुढच्या काही दिवसात 100 कोटी खर्च करून रेल्वे मार्ग करणार. हा असंतोष मतपेटी तुन व्यक्त करावा, असं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस शतरंज का बादशाह, जालन्याच्या जल आक्रोश मोर्चात रावसाहेब दानवेंची फुल्ल बॅटींग
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जालनाः जालन्यात सुरु असलेल्या जलाक्रोश मोर्चात आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप स्तुतीसुमने उधळली. उत्तम वाक्टपटू, उत्तम संसदपटू असलेला हा शतरंज का बादशहा आहे.. त्यानं राज्यसभेच्या निवडणुकीत  (Rajyasabha Election) अशी चौसर खेळली की कमी मतं असतानाही भाजपचा उमेदवार निवडून आणला. हा शतरंजचा बादशहा यशस्वी ठरला… अशा शब्दात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) स्तुती केली. जालन्यातील पाणी समस्येवर भाजपच्या वतीने मोठा जलाक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले. अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जालन्याच्या पाणी वितरण योजनेसाठी निधी मिळाला, मात्र ठाकरे सरकारच्या काळात ही योजना तसूभरही पुढे सरकली नाही, असा आरोप दावने यांनी यावेळी भाषणात बोलताना केला.

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

जालन्यात आजच्या विराट मोर्चाला संबोधित करताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘ देवेंद्र फडणवीस हा शतरंज का बादशहा आहे. आपण त्यांना उत्तम संसदपटू म्हणतो. शी चौसर खेळल्या गेली राज्यसभेच्या निवडणुकीत की… आपल्याकडे मतं कमी होते, त्यांच्याकडे मतं जास्त होते. अशाही परिस्थितीत आपला शतरंज का बादशहा यशस्वी ठरला. भाजपचा उमेदवार विजयी झाला. आपल्या आग्रहासाठी ते येथे आलेत. मुख्यमंत्री असताना 6 वेळेस जालन्यात आले. आधी 2011 मध्ये 2 लाख ८५ हजार एवढी जालन्याची लोकसंख्या होती…. आता चार लाख लोकसंख्या आहे. 58 एमएलडी पाणी आमच्या शहराला लागतं.आज 15 एमएलडी पाणी येतंय. पण आया बहिणी रस्त्यावर येणारच… म्हणून आम्ही सरकारला इशारा देतोय. हा मोर्चा केवळ भाजपाचा नाही. चेहरा आमचा आहे. पण आमच्या पाठिशी जालनेकर आहेत. या मोर्चाची दखल सरकारनं घेतली पाहिजे. वरुणराजाही आज आमच्यासोबत आहे.

‘निवडणुकीत फटके मारल्याशिवाय गप्प बसायचं नाही’

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना रावसाहेब दानवे म्हणाले, आम्ही विरोधी पक्षात असलो तरी नागरिकांच्या मागणीला आम्ही प्रतिसाद दिला. आता सरकारलाही इशारा देतो की, आमचे प्रश्न सोडवले पाहिजेत. लोकांमध्ये असंतोष आहे. 2019 मध्ये अमित शहा यांनी सांगितले होते. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील मात्र निकाल लागल्यावर शिवसेना बदलली. आधीच्या सरकारने सुरु केलेल्या योजना यांनी बंद केल्या. आता प्रत्येक निवडुकीत फटके मारल्या शिवाय गप्प बसायचं नाही. आपलं सरकार असता तर समृध्दी महामार्ग सुरू झाला असता. पुढच्या काही दिवसात 100 कोटी खर्च करून रेल्वे मार्ग करणार. हा असंतोष मतपेटी तुन व्यक्त करावा, असं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं.