Jayant Patil : राज्यात हम करे सो कायदा..! दोघांचाच मनमानी कारभार, प्रभाग रचनेविरोधात राष्ट्रवादी सुप्रिम कोर्टात धाव घेणार

| Updated on: Aug 07, 2022 | 8:30 PM

राज्यात सर्वकाही नियम धाब्यावर बसवून सुरु आहे. आमदारांचा पाठींबा, एकनिष्टता एवढी ओसंडून वाहत होती तर मंत्रिमंडळ विस्ताराची हिम्मंत सरकार का दाखवत नाही असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.राज्यातील जनता ही हताश होऊन सरकारकडे पाहत आहे मात्र, हे दोघांचे सरकार दिल्लीवारीतच त्रस्त आहे. दुसरीकडे जनतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

Jayant Patil : राज्यात हम करे सो कायदा..! दोघांचाच मनमानी कारभार, प्रभाग रचनेविरोधात राष्ट्रवादी सुप्रिम कोर्टात धाव घेणार
जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
Image Credit source: Twitter
Follow us on

पुणे : राज्यात सध्या एकच चर्चेचा विषय आहे तो म्हणजे (Expansion of the Cabinet) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार तरी कधी..सरकार स्थापन होऊन आता 36 दिवस उलटले आहेत. असे असताना मंत्रिमंडळाचा पत्ता नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीच 700 हून अधिक निर्णय घेतले आहेत.एवढेच नाहीतर मंत्र्यांचे अधिकार थेट सचिवांना देण्याचा घाट घातला आहे. (Election) निवडणुका यांनीच पुढे ढकलल्या, सर्व निर्णय यांनीच घेतले त्यामुळे हम करे सो कायदा अशीच सध्याची स्थिती आहे. प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. शिवाय प्रभाग रचनेच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस हे सुप्रिम कोर्टात धाव घेणार असल्याचे (Jayant Patil) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. एठढेच नाही तर या निर्णयाच्या अनुशंगाने पुणे शहर महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मंत्री नेमायची हिम्मत सरकारमध्ये नाही

राज्यात सर्वकाही नियम धाब्यावर बसवून सुरु आहे. आमदारांचा पाठींबा, एकनिष्टता एवढी ओसंडून वाहत होती तर मंत्रिमंडळ विस्ताराची हिम्मंत सरकार का दाखवत नाही असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.राज्यातील जनता ही हताश होऊन सरकारकडे पाहत आहे मात्र, हे दोघांचे सरकार दिल्लीवारीतच त्रस्त आहे. दुसरीकडे जनतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पावसाने राज्यात थैमान घातले असताना साधे पंचनामे देखील झालेले नाहीत. वेळप्रसंगी मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याची तयारी यांनी दर्शवली पण मंत्री नको अशी भूमिका घेतल्याने जनतेमध्ये चीड निर्माण होत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

निर्णय बदलल्यामुळे 1 कोटीचा फटका

महापालिका निवडणुकांबाबत राज्य सरकारने आपला निर्णय बदलला आहे. प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करुन निवडणुका वेळेत पार पाडाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी पक्ष हा सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. अधिकार आहेत म्हणून त्याचा वापर कसाही केला जात आहे. त्यामुळे 1 कोटी रुपयांचे नुकसा झाले आहे. प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

विकास कामे पाहण्यासाठी केंद्रीय मंत्री बारामतीमध्ये

मिशन लोकसभा या अनुशंगाने भाजपाचे 9 केंद्रीय मंत्री हे राज्यात दाखल होणार आहेत. जे लोकसभा मतदार संघ विरोधकांच्या ताब्यात आहेत त्या मतदार संघात या मंत्र्यांचा दौरा राहणार आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण ह्या बारामती मतदार संघात दाखल होत आहेत. पक्ष संघटन, पक्षाचे कार्यक्रम हे तर होतीलच पण बारामती मतदार संघात शरद पवारांचे काम कसे आहे हे पाहण्यासाठी त्या येणार असल्याची मिश्किल टिपण्णी जयंत पाटील यांनी केली आहे.