AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदारांचे मोबाईल बंद म्हणता, पण तुम्ही त्यांना संपर्क का करताय? : जयंत पाटील

महाविकास आघाडीने आमदारांना डांबून ठेवलं असून, आमदारांचे मोबाईल काढून घेतले आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Jayant Patil on Chandrakant Patil) यांनी केला.

आमदारांचे मोबाईल बंद म्हणता, पण तुम्ही त्यांना संपर्क का करताय? : जयंत पाटील
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Nov 30, 2019 | 12:43 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडीने आमदारांना डांबून ठेवलं असून, आमदारांचे मोबाईल काढून घेतले आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Jayant Patil on Chandrakant Patil) यांनी केला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील (Jayant Patil on Chandrakant Patil) यांनी उत्तर दिलं. आमच्या आमदारांचे मोबाईल बंद असतील, पण तुम्ही त्यांना संपर्क का करताय? भाजपने घोडाबाजार सुरु केला आहे, मात्र त्यांचं पितळ उघडं पडलं आहे, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

विश्‍वासदर्शक ठराव महाआघाडी जिंकणारच आहे, 170 पेक्षा जास्त सदस्यांचे पाठबळ आहे. आमदारांचे मोबाईल काढून घेतले म्हणतात, पण भाजपला कशाला आमच्या आमदारांशी संपर्क करायचा आहे? भाजप घोडाबाजार करत आहे आणि त्यांचं पितळ आता उघड पडलेलं आहे. लोकशाही उद्ध्वस्त करत आहेत, आज त्यांचा डाव फसला आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय.

शपथविधी नियमबाह्य असल्याचा आरोप करणारे भाजप आता बालिशपणा करत आहे, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

नियमानुसारच शपथ घेतलेली आहे, अगोदर आणि नंतर कोण काय बोलतं याला महत्त्व नसतं. त्यांचं दुःख या माध्यमातून दिसतंय. विरोधीपक्षांची त्यांना खूप घाई झालेली आहे, शपथ नियमानुसारच झाली आहे, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

ठाकरेंचा शपथविधी बेकायदेशीर, भाजप सुप्रीम कोर्टात जाणार 

“जो शपथविधी झाला तोही बेकायदेशीर आहे. राज्यपालांना शपथ घेताना चार वेळेला टोकलं की तुमच्या श्रद्धा असू शकतात. बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले, अण्णाभाऊ साठेंबद्दल आम्हालाही श्रद्धा आहे. मात्र शपथ ही शपथ असते. ती त्या फॉर्मेटमध्ये घ्यावी लागते. जर ती त्या फॉर्मेटमध्ये घेतली नाही तर ती शपथ होत नाही. त्यामुळे जो शपथविधी झाला त्याबाबत एक याचिका राज्यपालांकडे दाखल केली आहे. यामुळे हा शपथविधी रद्द आणि बेकायदेशीर समजावा. नियमांच्या बाहेर समजावा असे राज्यपालांकडे दाखल केेलेल्या याचिकेत म्हटलं आहे. यावर राज्यपालांनी न्याय द्यावा. जर न्याय दिला नाही, तर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करु,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला (chandrakant patil criticized on sworn taking ceremony) आहे.

संबंधित बातम्या  

आम्ही फोडाफोडी केली तर भाजप रिकामं होईल, अनेक आमदार स्वगृही परततील : नवाब मलिक  

ठाकरेंचा शपथविधी बेकायदेशीर, भाजप सुप्रीम कोर्टात जाणार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली