आम्ही फोडाफोडी केली तर भाजप रिकामं होईल, अनेक आमदार स्वगृही परततील : नवाब मलिक

चंद्रकांत पाटील शपथविधीवर आक्षेप घेत आहेत, पण शपथविधीचा हा पायंडा भाजपने लोकसभेतून पाडला आहे, तसं असेल तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल, असं नवाब मलिक म्हणाले.

आम्ही फोडाफोडी केली तर भाजप रिकामं होईल, अनेक आमदार स्वगृही परततील : नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 30, 2019 | 11:49 AM

मुंबई : ठाकरे सरकारच्या शपथविधीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. महापुरुषांबद्दल आम्हालाही आदर आहे, मात्र शपथविधी हा शपथविधी असतो, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक (Nawab Malik on Chandrakant Patil)  यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील शपथविधीवर आक्षेप घेत आहेत, पण शपथविधीचा हा पायंडा भाजपने लोकसभेतून पाडला आहे, तसं असेल तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल, असं नवाब मलिक म्हणाले.

“भाजप दावा करत होता की 119 आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांचे स्वतःचे 105 आणि 14 अपक्ष. मात्र आज तशी परिस्थिती नाही. अनेक आमदार काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे येऊ इच्छितात. पण आम्हाला फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही. आमचं भाजपला आव्हान आहे की त्यांनी मतविभाजन मागावं.जी भाजपनं प्रथा सुरू केली आहे, ती पहिल्यांदा त्यांनी दुरूस्त करावी”, असं नवाब मलिक म्हणाले.

भाजपनं आमचे आव्हान स्वीकारावं, त्यांनी 119 आमदार कुठं आहेत ते दाखवा. भाजपमधील आमदार चलबिचल झाले आहेत. तेथील काही आमदार स्वगृही म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीत परतण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही फोडाफोडीचे राजकारण केले तर भाजप रिकामं होईल, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला. भाजप शपथेवर आक्षेप घेत आहे, परंतु तसं झालं तर संसद रिकामी करावी लागेल, असं नवाब मलिक म्हणाले. (Nawab Malik on Chandrakant Patil)

संबंधित बातम्या  

ठाकरेंचा शपथविधी बेकायदेशीर, भाजप सुप्रीम कोर्टात जाणार  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.