आधी केवळ गुजरातमध्ये हेरगिरी, आता संपूर्ण भारतात : जयंत पाटील

| Updated on: Nov 04, 2019 | 5:20 PM

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने (Jayant Patil on WhatsApp Snooping) भारतात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मोबाईल हॅक करुन त्यांची हेरगिरी केल्याचा खुलासा केला.

आधी केवळ गुजरातमध्ये हेरगिरी, आता संपूर्ण भारतात : जयंत पाटील
Follow us on

मुंबई: फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने (Jayant Patil on WhatsApp Snooping) भारतात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मोबाईल हॅक करुन त्यांची हेरगिरी केल्याचा खुलासा केला. यानंतर भारतात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil on WhatsApp Snooping) देखील याप्रकरणी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आधी गुजरातमध्ये होणारी हेरगिरी आता भारतात देखील होत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच भारतात अशाप्रकारची हेरगिरीची प्रकरणे होणे चिंताजनक असल्याचंही त्यांनी म्हटलं.

जयंत पाटील म्हणाले, “आधी गुजरातमध्ये हेरगिरीचे प्रकार झाले. आता भारतातही असे प्रकार होत आहे. हे चितेंची गोष्ट आहे. फेसबुकनं याबाबत माहिती उघड केली आहे. केंद्र सरकारला याबाबत मे महिन्यापासून माहिती होती. आता केंद्र सरकारने ज्यांच्यावर पाळत ठेवली जात होती त्यांची नावं जाहिर करावी. पाळत ठेवण्याचा खर्च कुठल्या एजन्सीनं केला. त्याची जबाबदारी कोणाची, कुणाच्या परवानगीनं ही पाळत ठेवण्यात आली याची माहिती देशाला समजायला हवी.”

राज्यातील दलित नेत्यांवर अशी पाळत ठेवण्यात आली. त्याच माहितीवर त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध जोडले का? याचाही खुलासा सरकारने करावा. तसेच राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावं आणि याची सखोल श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.