पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही, मी स्वतः साक्षीदार : जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रातील काका-पुतण्यांच्या राजकारणात मुंडे कुटुंबाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. शरद पवार यांनी मुंडेंचं घर फोडलं हा आरोप नेहमीच केला जातो. पण यात काहीही तथ्य नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे.

पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही, मी स्वतः साक्षीदार : जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Sep 23, 2019 | 8:34 PM

मुंबई : बीड जिल्ह्याच्या राजकारणाला काका-पुतण्यांच्या वादाचा इतिहास आहे. यावेळी पुन्हा एकदा मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात हा वाद समोर आलाय. त्यांच्याविरोधात पुतण्याच विधानसभा निवडणुकीत उभा राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचंही घर फोडलं आणि आता क्षीरसागरांचंही घर फोडल्याचा आरोप केला जातोय. पण या आरोपांवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad on Dhananjay Munde) यांनी उत्तर दिलंय. आपण स्वतः सर्व गोष्टींचा साक्षीदार असल्याचं त्यांनी (Jitendra Awhad on Dhananjay Munde) म्हटलंय.

“इतिहासाचा विपर्यास कुणीही करु नये. मी स्वतः साक्षीदार आहे सर्व गोष्टींचा. पवार साहेबांना सतत लक्ष्य केलं जातंय. बदामराव पंडित आणि धनंजय मुंडे यांच्यात सुरुवातीच्या काळात बैठका झाल्या. प्रत्येक वेळी पवार साहेबांनी अनेकदा सांगितलं की तुम्ही पक्ष सोडून नका, घर सोडू नका, मतभेद मिटवून टाका, प्रश्न संपवून टाका… पण त्यांचे मतभेद टोकाला होते. कोणताही माणूस एक-दोन वेळा समजावून सांगू शकतो. मी स्वतः सांगितलं, पण ते म्हणाले हे आपलं काम नाही. बदामराव पंडित आणि धनंजय मुंडे (Jitendra Awhad on Dhananjay Munde) यांच्यात जे निर्णय झाले, त्यावर पवार साहेबांनी फक्त शिक्कामोर्तब केलं,” असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

परळी मतदारसंघाचा वाद आणि धनंजय मुंडेंचं बंड

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे पाच वेळा आत्ताचा परळी आणि पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघातून आमदार झाले. 1985 मध्ये पंडितराव दौंड यांच्याविरुद्ध गोपीनाथ मुंडेंचा पराभव झाला होता. 2009 ला परळी मतदारसंघाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून पंकजा मुंडे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. याच दरम्यान एकेकाळी गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार मानले जाणारे पुतणे धनंजय मुंडे (Jitendra Awhad on Dhananjay Munde) यांनीही आश्चर्यकारकरित्या गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली.

गोपीनाथ मुंडे 2009 ला पहिल्यांदा खासदार झाले आणि त्यांच्या जागी मुलगी पंकजा मुंडे यांनी विधानसभेत बाजी मारली. 2009 ला धनंजय मुंडे निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. पण पंकजा मुंडे यांना विधानसभा आणि धनंजय मुंडेंना विधानपरिषद असं समीकरण ठरलं. याचवेळी नाराजीनाट्य सुरु झालं आणि ते धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानेच थांबलं.

धनंजय मुंडे (Jitendra Awhad on Dhananjay Munde) ज्या काकांच्या हाताला धरुन राजकारणात आले, त्याच काकांविरोधात त्यांनी बंड पुकारलं. 2010 ते 2012 या काळात काका-पुतण्यांमध्ये अनेक विषयांवरुन मतभेद समोर आले. अखेर जानेवारी 2012 मध्ये परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन धनंजय मुंडेंनी बंडाचं हत्यार उपसलं.

पंकजा मुंडेंची एंट्री आणि धनंजय मुंडेंची अपरिहार्यता

बीडमधील स्थानिक पत्रकार भागवत तावरे यांच्या मते, “शरद पवारांनी मुंडेंच्या घरात लक्ष देण्यापूर्वीच पंकजा की धनंजय हा वाद सुरु झाला होता. सुरेश धस हे तेव्हा राष्ट्रवादीत होते. त्यांनी धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वाला दाबलं जातंय हा प्रस्ताव पवारांसमोर मांडला. सुरेश धस यांच्या निगराणीतच धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत आणलं. परळीत अजित पवारांच्या उपस्थितीतच कार्यक्रम झाला. त्याचवेळी धनंजय मुंडेंनी आपल्यावर झालेला अन्याय मांडला होता.”

परळी नगरपालिकेत भाजपला धक्का

बीडमधील पत्रकार बालाजी तोंडे यांच्या मते, “2009 च्या विधानसभेला सुरुवातीपासून धनंजय मुंडेंचं नाव चर्चेत होतं. पण पंकजा मुंडे यांचं नाव आलं. धनंजय मुंडेंच्या (Jitendra Awhad on Dhananjay Munde) नाराजीनंतर सुरेश धस यांच्या माध्यमातून गळ टाकण्यात आला. गुप्त बैठका विविध ठिकाणी झाल्या. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. पण एका मताने भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार पडला. भाजपचेच असलेले उपाध्यक्ष म्हणून धनंजय मुंडे विजयी झाले. शेवटच्या काही मिनिटात ठरलं होतं. त्याचवेळी मुंडेंच्या घरात फूट पडण्यास सुरुवात झाली होती.

यानंतर नोव्हेंबर 2011 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. यात भाजपला बहुमत मिळालं. पण धनंजय मुंडे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि संपूर्ण नगरपालिका राष्ट्रीवादीच्या ताब्यात गेली. नगरपालिका मिळाल्यानंतर परळीत अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. तेव्हा पंडित अण्णा मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, पण भाजपचे आमदार असल्यामुळे धनंजय मुंडेंनी तेव्हा प्रवेश केला नाही.”

Non Stop LIVE Update
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.