लालबाग चिवडा गल्ली ते दिल्लीतील मंत्री : अरविद सावंतांचा प्रवास

| Updated on: May 30, 2019 | 9:06 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेत आहेत. पुण्यातील परिवर्तन या संस्थेने देशातील खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले. यात महाराष्ट्रातील खासदारांमध्ये दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना पहिला क्रमांक दिला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या सरकारच्या कालावधीत अरविंद सावंत यांनी  एमएटीएनएलच्या खासगीकरणाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. […]

लालबाग चिवडा गल्ली ते दिल्लीतील मंत्री : अरविद सावंतांचा प्रवास
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेत आहेत. पुण्यातील परिवर्तन या संस्थेने देशातील खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले. यात महाराष्ट्रातील खासदारांमध्ये दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना पहिला क्रमांक दिला आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या सरकारच्या कालावधीत अरविंद सावंत यांनी  एमएटीएनएलच्या खासगीकरणाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी खुद्द वाजपेयी मुंबईतील राज भवनात बाळासाहेबांसोबत बसले होते. सरकारविरोधात शिवसेनेच्या माणसाने मोर्चा काढल्याची बाब अटलबिहारींच्या कानावर आली. तुमचा माणूस सरकारविरोधात मोर्चा काढत असल्याचे त्यांनी बाळासाहेबांच्याही कानावर घातले. बाळासाहेबांनी त्यावेळी अरविंद सावंत यांची बाजू घेत, थेट ‘वो मेरा बेटा है’ असे म्हटले. तसेच हे आंदोलन सरकारविरोधात नाही, तर एमएटीएनएलच्या खासगीकरणाविरोधात मोर्चा काढल्याचे अटलबिहारींना सांगितले.

अटलबिहारींनी बाळासाहेबांच्या वक्तव्यानंतर या प्रकरणाची माहिती घेतली आणि एमटीएनएलचे खासगीकरण करणे टाळले. अरविंद सावंत त्यावेळी एमएटीएनएल कामगारांच्या युनियनचे अध्यक्ष होते. त्यांनी एमटीएनएलच्या खासगीकरणाला रोखण्याची मोठी लढाई जिंकली होती. आज हेच अरविंद सावंत मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून दिल्लीत पोहचले आहेत.

अरविंद सावंत यांचा राजकिय प्रवास

अरविंद सावंत शिवसेनेत गटप्रमुख, उपनेता, विधान परिषद आमदार आणि नंतर दक्षिण मुबंईतून 2014 आणि 2019 रोजी सलग दोनदा मिलिंद देवरांना पराभूत करुन खासदार झाले. 2019 चा विजय शिवसेनेसाठी आणि अरविंद सावंत यांच्यासाठी मोठा ठरला. कारण उद्योगपती मुकेश अंबानी आणि दीपक पारेख यांनी स्वतः सार्वजनिकपणे मिलिंद देवरा यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतरही अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले. तसेच आज केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीतही पोहचले. त्यांचा हा प्रवास अनेक शिवसैनिकांसाठी अभिमानाचा भाग ठरला.