“ठाकरे सरकारकडून विदर्भावर अन्याय, नागपूर पदवीधरमध्ये भाजपच जिंकणार”: चंद्रशेखर बावनकुळे

| Updated on: Nov 13, 2020 | 7:45 PM

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर पदवीधरमध्ये भाजप जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. Bawankule on MLC Election

ठाकरे सरकारकडून विदर्भावर अन्याय, नागपूर पदवीधरमध्ये भाजपच जिंकणार: चंद्रशेखर बावनकुळे
chandrashekhar bawankule
Follow us on

गोंदिया: भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार असल्याने विदर्भावर अन्याय होत आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. विदर्भावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ( BJP leader Chandrashekhar Bawankule allegations on Thackeray Govt)

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला मतदान होत आहे. यामुळे राजकीय पक्षांनी प्रचारावर जोर लावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपनं नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना संधी दिली आहे. या पदवीधर मतदारसंघात मागील ५० वर्षांपासून भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा भाजपचं विजयी होणार असल्याचा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.  भाजपनं नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवली आहे. काँग्रेस कडून अभिजित वंजारी यांना मिळाली आहे. (Chandrashekhar Bawankule allegations on Thackeray Govt)

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येत असल्याने विदर्भावर अन्याय होत आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने नेहमीच विदर्भावर अन्याय केला असून आम्ही हे खपवून घेणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

भाजपकडून विधिमंडळ अधिवशेनावरुन सरकारवर टीकास्त्र

राज्य सरकारनं कोरोनाचं कारण देत विधिमंडळाचं अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णायाचे राज्य सरकारकडून समर्थन करण्यात येत असले तरी भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांनीही सरकारवर विधिमंडळ अधिवेशनावरुन टीका केलीय.

राज्य सरकारची विधिमंडळ अधिवेशन घेण्याची मानसिकता नाही. भाजपला महाराष्ट्रातील अनेक प्रश्न अधिवेशनात मांडायचे आहेत. महिला अत्याचार , अतिवृष्टी, बेरोजगारी हे प्रश्न राज्यात आहेत. आम्हाला या प्रश्नांवर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा घडवून आणायची आहे, असंही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी नागपूरचे अधिवेशन हा कायदा आहे. त्यामुळे तिथे अधिवेशन झालेच पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. हिवाळी अधिवेशन रद्द केले असले तरी नागपूरला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन घ्यावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेऊन विदर्भाला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगतिले.

संबंधित बातम्या :

Nagpur | नागपूर विभाग पदवीधर निवडणूकची जबाबदारी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंवर

फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच भाजपला बिहारमध्ये यश; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

(Chandrashekhar Bawankule allegations on Thackeray Govt)