भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे लगीनघाई, द्वितीय कन्येचा जामनेर येथे विवाह

भाजपचे (BJP) नेते गिरीश महाजन (girish mahajan) सध्या आपल्या मुलीच्या लगीनघाईत व्यस्त आहेत . 20 मार्च रोजी गिरीश महाजन यांच्या द्वितीय कन्येचा जामनेर (jamner) येथे विवाह सोहळा आहे.

भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे लगीनघाई, द्वितीय कन्येचा जामनेर येथे विवाह
गिरीश महाजन
Image Credit source: facebook
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 9:01 AM

जळगाव – विधानसभेत राजकीय आरोप प्रत्यारोप गदारोळातच्या नेहमी होत असतो. त्याही पलीकडे नेतेमंडळींना घरची ही जबाबदारी तेवढीच लक्ष देऊन पार पाडावी लागते. याचे उदाहरण म्हणजे भाजपचे (BJP) नेते गिरीश महाजन (girish mahajan) सध्या आपल्या मुलीच्या लगीनघाईत व्यस्त आहेत . 20 मार्च रोजी गिरीश महाजन यांच्या द्वितीय कन्येचा जामनेर (jamner) येथे विवाह सोहळा आहे. त्यामुळे विधानसभेचे कामकाज आटोपून भेटलेल्या वेळेत गिरीश महाजन आपल्या जामनेर येथील निवासस्थानी मुलीच्या लग्नाची तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. विवाह मंडपाची तयारी असेल, वरातीसाठी लागणारा घोडा असेल, अशा अनेक कामाच्या लगीनघाईत गिरीश महाजन सध्या व्यस्त आहेत.

लग्नाच्या कार्यात महाजन व्यस्त

कोरोनाच्या काळात मागच्या दोन वर्षात अनेक नेत्यांनी मुलांची लग्न साध्या पद्धतीने केली. तसेच कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक नेत्यांनी मुलांची लग्न केली. महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रमांवरती बंधनं असल्यामुळे कार्यक्रमाला अनेकांना बोलावणं शक्य नव्हतं.सध्या गिरीश महाजन मुलीचं लग्न जळगावमध्ये कशा पद्धतीने करतायेत याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. लग्नाच्या कार्यात महाजन व्यस्त असल्याने शाही पद्धतीने विवाह करील असा अनेकांचा अंदाज आहे. कारण आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी आपल्या मुलांची शाही पद्धतीने केली आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुध्दा आपल्या मुलीचं लग्न काही महिन्यांपुर्वी केलं. त्या लग्नाला देशातील अनेक नेते उपस्थित होते.

जितेंद्र आव्हाडांची मुलीचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीने केलं

एकुलती एक मुलगी असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी मागच्या महिन्यात आपल्या मुलीचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीने केले असल्याचे ट्विटच्या माध्यमातून सांगितले. त्यावेळी अनेकांनी त्यांचं कौतुक देखील केलं. कारण कोरोनाच्या काळात अशा पद्धतीने अनेकांनी लग्न केली आहेत. आव्हाडांच्या मुलींच्या लग्नात कोणताही गाजावाजा नाही. अत्यंत साध्या पध्दतीने वकीलांच्यासमोर लग्न झालं. त्या लग्नात मुलाचे आईवडील आणि मुलीचे आईवडील आणि एक वकील दिसून आले होते.

चीन, हाँगकाँगमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले; मनसुख मांडवियांच्या अध्यक्षतेखाली बैठक, आरोग्य प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना

ICC Women’s world cup 2022 : भारतीय संघासमोर उपांत्य फेरीचा मार्ग कठीण, तरीही विजयाचं लक्ष्य सोपं, काय आहे यशाचं समीकरण?

Amit Thackeray : वरळीत अमित ठाकरेंची होळीनिमित्त हजेरी, राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा, काय आहे चर्चेमागचं कारण?