AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Thackeray : वरळीत अमित ठाकरेंची होळीनिमित्त हजेरी, राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा, काय आहे चर्चेमागचं कारण?

राज्यात आज होळीचा सण साजरा होतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील होळी उत्सवात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात अमित ठाकरेंनी हजेरी लावल्यानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर ही हजेरी नाही ना, अशीही चर्चा सध्या रंगली आहे. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते होलीका दहन करण्यात आलं. होळीनिमित्त कोळी बांधव आणि भगिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.

Amit Thackeray : वरळीत अमित ठाकरेंची होळीनिमित्त हजेरी, राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा, काय आहे चर्चेमागचं कारण?
मनसे नेते अमित ठाकरेंची वरळीत होळीनिमित्त हजेरी. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 7:05 AM
Share

मुंबई : राज्यात आज होळीचा सण (Holi festival) साजरा होतोय. राज्यभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातोय. यावेळी राजकीय नेते मंडळी देखील या उत्सवात भाग घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी देखील होळी उत्सवात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thacekray) यांच्या वरळी (Varali) मतदारसंघात अमित ठाकरेंनी हजेरी लावल्यानं महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election) पार्श्वभूमीवर तर ही हजेरी नाही ना, अशीही चर्चा सध्या रंगली आहे. मध्यरात्री वरळी कोळीवाड्यात खास होळीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते होलीका दहन करण्यात आलं. होळीनिमित्त कोळी बांधव आणि भगिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. या उत्साहाच्या वातावरणात आणि अमित ठाकरेंच्या उपस्थितीत होळी सण साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिकांची आणि कोळी बांधावांची गर्दी दिसून आली.

हजेरी अन् चर्चेला उधान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी वरळीत होळीनिमित्त हजेरी लावली आहे. मात्र, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्च्या रंगल्या आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अमित ठाकरेंची हजेरी कशी, यामागे महापालिकेचे गणित तर नाही ना, अशाही चर्चा सध्या केंद्रस्थानी आहेत. आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंच्या वरळीमधील होळीनिमित्त लावले्या हजेरीला त्या दृष्टीकोणातून जाणकार पाहतायेत. अमित ठाकरेंची वरळीमधील उपस्थिती आणि होळी  सणातील सहभाग हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचं बोललं जातंय. कारण, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मतदारांशी संवाद साधायला सुरु केलंय. या न त्या कारणांना राजकीय नेते मंडळी आपापल्या  मतदारसंघात मतदारांशी संवाद साधताना दिसून येतायेत.

महापालिका निवडणूक आणि सहभाग

आगामी काळात मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यात महापालिकेच्या निडवणुका आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळी मतदारसंघात कोणत्या न कोणत्या कारणानं स्थानिकांशी संवाद साधताना दिसतायेत. मुंबई महापालिकेतील राजकीय पक्ष देखील याची तयारी करत असल्याचं दिसून येतंय. यात होळी सणानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी होळीनिमित्त लावलेल्या हजेरीमागे महापालिका निवडणुकीचे गणित तर नाही ना, याकडे देखील वेगळ्या नजरेतून पाहिलंय जातंय.

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात हजेरी

वरळी हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. आता होळीच्या निमित्तानं अमित ठाकरे यांनी हजेरी लावली असल्याने याला विशेष राजकीय महत्व दिले जात आहे.

इतर बातम्या

Aurangabad | महापालिकेची घंटागाडी वेळेवर येत नाही? औरंगाबादकरांनो, कॉल करा आणि 5 तासात समस्या दूर करा

Russia Ukraine Crisis : युद्धाचा सर्वाधिक फटका अशिया खंडात भारताला बसणार, S&P ग्लोबल रेटिंग्सचा अंदाज

Maharashtra News Live Update : मनसे नेते अमित ठाकरेंची वरळी कोळीवाड्यातील होळीला हजेरी

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.