केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेत छोट्या शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचं आवाहन

कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा ठाणे जिल्ह्यातून जात आहे. पाटील यांनी जन-आशीर्वाद यात्रेच्या चौथ्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. ग्रामीण भागात जोरदार पाऊस असूनही यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गावोगावी, चौका चौकात पाटील यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.

केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेत छोट्या शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचं आवाहन
केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांची जन-आशीर्वाद यात्रा
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 8:28 PM

ठाणे : ‘मोदी सरकारने छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन छोट्या शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे’, असं आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गुरुवारी केलं. कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा ठाणे जिल्ह्यातून जात आहे. पाटील यांनी जन-आशीर्वाद यात्रेच्या चौथ्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. ग्रामीण भागात जोरदार पाऊस असूनही यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गावोगावी, चौका चौकात पाटील यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. (Farmers should take advantage of central government’s schemes – Kapil Patil)

मुरबाड शहरात शेतकरी, आदिवासी आणि व्यापाऱ्यांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी त्यांना निवेदने दिली. पाटील यांनी यावेळी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाच्या मागणीसंदर्भात आपण व्यक्तिगत लक्ष घालू असे आश्वासन पाटील यांनी दिलं. शिवले गावात वारकऱ्यांचा आणि केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चंदूदादा सेंद्रीय शेतकरी उत्पादक गट कंपनीच्या भाजीपाला स्टॉलचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कपिल पाटील यांनी या स्टॉलधारक शेतकऱ्यांना केंद्रीय योजनांची माहिती देण्याचे निर्देश स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना दिले.

शेतकरी, मच्छिमारांशी संवाद

सरळगाव, किन्हवली येथे चौक सभेत त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा व शेतकऱ्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वडवली येथे त्यांनी मासेमारीसाठी हाताने जाळे व पागे विणणाऱ्या कारागिरांशी संवाद साधला. राज्यातील हे एकमेव गाव आहे जिथे ही जाळी हाताने विणली जातात. या कारागिरांनी मांडलेल्या प्रश्नात आपण लक्ष घालू असंही त्यांनी सांगितलं. सापगावमध्येही त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. शहापूर शहरात यात्रा दोन तास उशीरा पोहोचूनही स्वागतासाठी प्रचंड जनसमुदाय भर पावसात उपस्थित होता.

‘ठाण्याचा वनवास 74 वर्षाने संपला’

दोन दिवसांपूर्वी कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ठाण्यातून सुरुवात झाली. त्यावेळी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. प्रभू रामाचा वनवास 14 वर्षांनी संपला होता. ठाण्याचा वनवास 74 वर्षांनी संपला. मोदींनी मला मंत्रिपद दिलं. मोदी है तो मुमकीन है, असं कपिल पाटील म्हणाले होते.

मोदींमुळे ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले आहे. रामाचा वनवास हा 14 वर्षाने संपला होता. मात्र ठाण्याचा वनवास 74 वर्षाने संपला आहे. खऱ्या अर्थाने हे मंत्री पद ठाण्याला मिळाले. त्यामुळे मोदी हे तो मुमकींन है… मला दिलेली जबाबदारी ही ठाण्यापुरती नाही संपूर्ण देशात काम करायचे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 2014 पर्यंत मी भरकटलेलो होतो, आता नेमकी दिशा सापडली आहे, असंही पाटील म्हणाले होते.

इतर बातम्या :

‘आमदार गोपीचंद पडळकरांना अटक करुन दाखवाच’, बैलगाडा शर्यतीवरुन सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा

गुप्तांगात सोनं लपवून मुंबईत आणलं, तीन स्त्रियांना शिताफीने अटक, NCB ची धडक कारवाई

Farmers should take advantage of central government’s schemes – Kapil Patil