
बिहार विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवावर काँग्रेसमध्ये मंथन सुरु असताना पक्षासमोर आता एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. नेतृत्व बदलासाठी हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रा शेजारच हे राज्य आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर नवीन पेच उभा राहिलाय. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मानणारा काँग्रेसमधील एक गट गुरुवारी नवी दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. या सर्वांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. रात्री उशिरा ही बैठक झाली.
या बैठकीमुळे कर्नाटक काँग्रेस अंतर्गत सत्तेसाठी चढाओढ सुरु असल्याच्या अफवांना बळ मिळतय. आधी समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार शिवकुमार यांचा निकटवर्तीय एक मंत्री आणि काही आमदार पक्षाच्या सिनिअर नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. कर्नाटक काँग्रेसचे आमदार आणि काँग्रेस अध्यक्षांमध्ये काय चर्चा झाली, ते अजून समोर आलेलं नाही. याचे डिटेल्स सीक्रेट आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांना त्यांच्या ऑफिसमध्ये अडीच वर्ष पूर्ण केली. त्यानंतर बरोबर दुसऱ्यादिवशी बैठक होत आहे.
ते मुख्यमंत्री बनले
2023 साली कर्नाटकात भाजपचा पराभव करुन काँग्रेसने पुन्हा सत्ता मिळवली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धारमैया आणि शिवकुमार यांच्यात स्पर्धा होती. अखेरी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सिद्धारमैया यांच्या पारड्यात आपलं मत टाकलं. ते मुख्यमंत्री बनले. शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. काँग्रेस हायकमांडने ही तडजोड घडवून आणली.
हा शब्द मीडियाने बनवलाय
कर्नाटक काँग्रेसमध्ये या घडामोडी सुरु असताना सिद्धारमैया यांच्याकडून एक स्टेटमेंट आलय. त्यामुळे कदाचित हा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे. ‘मी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार’ असं सीएम सिद्धारमैया यांनी म्हटलं आहे. 20 नोव्हेंबरला त्यांनी नोव्हेंबर क्रांतीची चर्चा आणि बातम्या फेटाळून लावल्या. हा शब्द मीडियाने बनवलाय असं त्यांनी सांगितलं. सुरुवातीपासून माझं स्थान बळकट आहे आणि भविष्यातही राहील असं सिद्धारमैया म्हणाले. या स्टेटमेंटवरुन शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद सहजासहजी मिळणार नाही असं दिसतय.