Ketaki Chitale : केतकी चितळे प्रकरणी पोलीस महासंचालकांना नोटीस, केंद्रीय महिला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Jun 16, 2022 | 4:02 PM

केंद्रीय महिला आयोगाने याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावली आहे. तसेच पोलीस महासंचालकांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरणं नवं ट्विट घेताना दिसून येतंय.

Ketaki Chitale : केतकी चितळे प्रकरणी पोलीस महासंचालकांना नोटीस, केंद्रीय महिला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश
अभिनेत्री केतकी चितळे हिची ठाणे कारागृहातून अखेर सुटका
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवासांपासून राज्याच्या राजकारणात केतकी चितळे (Ketaki Chitale) हे नाव सतत वादात आहे. शरद पवारांबाबाची (Sharad Pawar) आक्षेपार्ह पोस्ट केतकी चितळेला जेलवारीपर्यंत घेऊन गेली. केतकी चितळेने आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टात तर धाव घेतलीच आहे. मात्र आता या प्रकरणाची दखल केंद्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. केंद्रीय महिला आयोगाने (Central Women Commission) याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावली आहे. तसेच पोलीस महासंचालकांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरणं नवं ट्विट घेताना दिसून येतंय. या प्रकरणात आता पोलिसांच्या अडचणी वाढणार का? असाही सवाल या नोटीसीनंतर विचारण्यात येत आहे. त्यामुळे महिला आयोग यात काय भूमिका घेतोय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे केतकी चितळे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट टाकली. त्यानंतर केतकी चितळेविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. तिला सर्वात आधी नवी मुंबईतील कळंबोली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तिचा ताबा हा ठाणे पोलिसांना देण्यात आला. त्यानंतर कोर्टाने केतकीला कोठडी सुनावली. मात्र याचदरम्यान केतकीवर गुन्हे दाखल होण्याची मालिका ही सुरूच राहिली. केतकीवर राज्यात जवळपास 20 पेक्षाही जास्त ठिकाणी याच प्रकरणात गुन्हे दाखल झाले. तर दुसरीकडे एका अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातही तिला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं होतं. तिने अनेक दिवस हे विविध प्रकरणात जेलमध्ये घालवले आहेत.

अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत कोर्टात धाव

केतकीने आपली अटक ही बेकायदेशील असल्याचा दावा करत कोर्टात धाव घेतली. आजच तिन याच प्रकरणात हायकोर्टात दुसरी याचिका दाखल केली आहे. तसेच आता या प्रकरणात महिला आयोगानाही पाऊलं उचलायला सुरू केल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या सध्या रुपाली चाकणकर आहेत. मात्र आता हे प्रकरण थेट केंद्रीय महिला आयोगाकडे गेल्याने या प्रकरणावरून राजकारणही पुन्हा तापण्याची शक्यता आहे. केतकी चितळेने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर राष्ट्रवादीही तिच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. राष्ट्रवादीने केतकी चितळेविरोधात राज्यभर आंदोलनंही केली होती. तसेच नवी मुंबई पोलिसांनाकडून केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेताना केतकीवर हल्लाही झाला होता. मात्र तेव्हाही केतकी चितळे ही हसतानाच दिसून आली होती.