मिलिंद नार्वेकरांनी अनधिकृत बंगला पाडला, गुन्हा का नाही? किरीट सोमय्यांचा सवाल

| Updated on: Aug 23, 2021 | 6:47 PM

मिलिंद नार्वेकरांचा बंगला पाडला. आता पालकमंत्री अनिल परबांचे रिसॉर्ट मुख्यमंत्री केव्हा पाडणार? असा सवालही सोमय्या यांनी केलाय. मिलिंद नार्वेकर यांनी चोरी केली, लबाडी केली त्यामुळे केंद्राची टिम आली. मिलिंद नार्वेकर यांच्यावर बंगला अनधिकृत असल्याने त्यांचा बंगला पाडण्यासाठी दबाव आणला गेला असंही सोमय्या म्हणाले.

मिलिंद नार्वेकरांनी अनधिकृत बंगला पाडला, गुन्हा का नाही? किरीट सोमय्यांचा सवाल
Milind Narvekar, Kirit Somaiya
Follow us on

रत्नागिरी : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील बंगला पाडण्याचं काम सुरु आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज या पाडकामाची पाहणी केली. सोमय्या हे जवळपास 15 मिनिटे नार्वेकरांच्या बंगल्याबाहेर उभे होते. प्रशासनाला मिलिंद नार्वेकरांविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता म्हणून नार्वेकर यांना स्वत: बंगल्या पाडण्यास सांगितलं, असा आरोप सोमय्या यांनी यावेळी केलाय. मागील आठवड्यात मिलिंद नार्वेकर यांच्या घराबाबत किरिट सोमय्या यांनी प्रशासनाला इशारा दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी केलाय. (Kirit Somaiya inspects demolition work of Milind Narvekar’s unauthorized bungalow)

मिलिंद नार्वेकरांचा बंगला पाडला. आता पालकमंत्री अनिल परबांचे रिसॉर्ट मुख्यमंत्री केव्हा पाडणार? असा सवालही सोमय्या यांनी केलाय. मिलिंद नार्वेकर यांनी चोरी केली, लबाडी केली त्यामुळे केंद्राची टिम आली. मिलिंद नार्वेकर यांच्यावर बंगला अनधिकृत असल्याने त्यांचा बंगला पाडण्यासाठी दबाव आणला गेला असंही सोमय्या म्हणाले. तर शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या टीकेचाही सोमय्या यांनी समाचार घेतलाय. वैभव नाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिमत असेल तर त्यांनी हरित लवादामध्ये खटला दाखल करावा, असं आव्हान किरिट सोमय्या यांनी शिवसेनेला दिलंय.

आता नंबर अनिल परब यांच्या रिसॉर्टचा- सोमय्या

मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याची पहाणी केल्यानंतर किरिट सोमय्या यांनी केली मुरुडमधील पालकमंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचीही पहाणी केली. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला गेला, आता नंबर पालकमंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा आहे, असा दावाही सोमय्या यांनी केलाय. अनिल परब यांचा 18 हजार स्केअरफुटचा अनधिकृत रिसॉर्ट बांधला असं महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला कळवलं आहे. या रिसॉर्टसाठी 5 कोटी 41 लाख रुपये या रिसॉर्टला खर्च केला. त्यासाठीचा पैसा कुठून आला? त्याची चौकशी आता इन्कम टॅक्सने सुरु केली आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

‘..अन्यथा नृसिंहवाडीला जलसमाधी घेऊ’, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राजू शेट्टींचा सरकारला इशारा

‘महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं रोखलं तरी दहिहंडी होणार’, भाजप आमदाराचं थेट आव्हान

Kirit Somaiya inspects demolition work of Milind Narvekar’s unauthorized bungalow