‘महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं रोखलं तरी दहिहंडी होणार’, भाजप आमदाराचं थेट आव्हान

हिंदू उत्सव साजरा करायला निघालो आहोत तर सरकार त्यावर बंदी घलत आहे आजची बैठक ही केवळ फसवणूक करणारी होती. या बैठकीला फक्त सरकारचं समर्थन करणारे आजी-माजी आमदार होते. अनेक मंडळांना त्यांनी विचारात घेतलं नाही. चर्चा करायची नाही आणि निर्णय घ्यायचा, मग बैठक घेता तरी कशाला? असा सवाल राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.

'महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं रोखलं तरी दहिहंडी होणार', भाजप आमदाराचं थेट आव्हान
दहिहंडी उत्सव फाईल फोटो
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 6:14 PM

मुंबई : जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी संयमी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहिहंडी उत्सवाबाबत घेतली आहे. महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला. दरम्यान, राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी थेट आव्हान दिलंय. महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं कितीही रोखलं तरी यंदाची दहिहंडी होणार, असं राम कदम यांनी म्हटलंय. (BJP MLA Ram Kadam aggressive over Dahihandi festival)

जनतेला अपेक्षा होती की हिंदुंचा हा मोठा सण आहे आणि तो होईलय. फक्त काही नियम आखून दिले जातील असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून मागणी करत आहोत. अपशकुनी वसुली सरकार बिअर बार उघडण्यासाठी नियम लावतं. तर नियम लावून मंदिरं उघडायला काय हरकत आहे. हिंदू उत्सव साजरा करायला निघालो आहोत तर सरकार त्यावर बंदी घलत आहे आजची बैठक ही केवळ फसवणूक करणारी होती. या बैठकीला फक्त सरकारचं समर्थन करणारे आजी-माजी आमदार होते. अनेक मंडळांना त्यांनी विचारात घेतलं नाही. चर्चा करायची नाही आणि निर्णय घ्यायचा, मग बैठक घेता तरी कशाला? असा सवाल राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.

‘500 गुन्हे दाखल करा, दहिहंडी उत्सव होणार’

फसव्या घोषणा करणारं आणि लोकांना फसवणारं हे सरकार आहे. बार उघडताला तिसरी लाट आडवी येत नाही. मात्र, मंदिरं उघडण्यासाठी तिसऱ्या लाटेची भीती दाखवली जाते. दारुची दुकानं कोरोनाप्रुफ आहेत का? कोणत्याही परिस्थितीत घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सव होणारच. 500 गुन्हे दाखल करा. तुमच्या कोणत्याही धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, अशी आक्रमक भूमिका राम कदम यांनी घेतली आहे.

गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींच्या मुख्यमंत्र्यांकडे 5 मागण्या

1) आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी. 2) दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे. 3) गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. 4) कोविड 19 संसर्गाची जाणिव ठेवुनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी. 5) दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.

आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ

बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे… गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत… त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं… लस घेतल्यावर देखील काही देशात लाँकडाऊन करण्यात आलंय… इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केलीय… अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे… कारण अनेकांची हातावर पोट आहेत.. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलांय… आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

इतर बातम्या :

गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्ला

कोळी समाज दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला मागतोय म्हणून त्यांना मुंबईबाहेर फेकताय काय?, मनसेचा सेनेला सवाल

BJP MLA Ram Kadam aggressive over Dahihandi festival

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.