काल इशारा आज अॅक्शन! आधी अनिल परब आता ‘यांचा’ नंबर, किरीट सोमय्या थेट पोलीस स्टेशनमध्ये

| Updated on: Jan 01, 2023 | 12:06 PM

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भाजप नेते किरिट सोमय्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांनी तक्रार दाखल केली आहे...

काल इशारा आज अॅक्शन! आधी अनिल परब आता यांचा नंबर, किरीट सोमय्या थेट पोलीस स्टेशनमध्ये
Follow us on

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काल एक ट्विट करत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) इशारा दिला होता. 2022 वर्षातील शेवटच्या दिवशी 5 नेत्यांची नावं घेत सोमय्यांनी नव्या लढाईची घोषणा केली आहे. काल इशारा दिल्यानंतर सोमय्या आज थेट पोलीस स्टेशनला पोहोचलेत आणि ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

19 बंगल्यांप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

नव्या वर्षात घोटाळे बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी जाहीर केलंय. याबाबतचं ट्विट करताना त्यांनी 5 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं साई रिसॉर्ट प्रकरण किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आहे. यासह राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचाही उल्लेख सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आणि महाविकास आघाडीला इशारा दिलाय.

आता ठाकरे परिवाराचा 19 बंगले घोटाळ्याचा ‘हिशेब सुरू’ नवीन वर्ष, सकाळी 11.30 वाजता रेवदंडा पोलिस स्टेशन येथे तक्रार FIR दाखल करणार आहे, असं म्हणत सोमय्या यांनी काल ठाकरेंना इशारा दिला होता. त्यानुसार आज त्यांनी तक्रार दाखल केली आहे.