नवे वर्ष नवे निशाणे! घोटाळे बाहेर काढणारच!, किरीट सोमय्या यांनी ‘या’ 5 नेत्यांची नावं जाहीर केली…

| Updated on: Dec 31, 2022 | 9:34 AM

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत नव वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केलेत. पाहा कुणाची नावं आहेत...

नवे वर्ष नवे निशाणे! घोटाळे बाहेर काढणारच!, किरीट सोमय्या यांनी या 5 नेत्यांची नावं जाहीर केली...
किरीट सोमय्या
Follow us on

मुंबई : 2022 वर्ष संपत आलंय. 2023 च्या उंबरठ्यावर आपण आहोत. अशात नव्या वर्षात काय करायचं याचे संकल्प केले जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करत नव वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केलेत. यात त्यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi )काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावं जाहीर केली आहेत.

नव्या वर्षात घोटाळे बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी जाहीर केलंय. याबाबतचं ट्विट करताना त्यांनी 5 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत.

उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं साई रिसॉर्ट प्रकरण किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आहे. यासह राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचाही उल्लेख सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे 19 बंगलो. अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, हसन मुश्रीफ आणि पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळा, SRA च्या घरांमधील घोटाळा या गोष्टी नव्या वर्षामध्ये आपल्या निशाण्यावर असतील असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.