AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KMC Election 2022 ward 25 : कोल्हापूर महापालिका काँग्रेस, राष्ट्रवादीकडून खेचून आणण्याचं भाजपसमोर आव्हान, प्रभाग क्रमांक 25 चं गणित काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात चंद्रकांत दादांना मंत्रिपपदही मिळालंय. त्यामुळे यंदा महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते भाजपाकडे वळतील तसेच शिवसेनेतील काही उमेदवार भाजपसोबत हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूरात ताराराणी आघाडीलाही विशेष महत्त्व आहे.

KMC Election 2022 ward 25 : कोल्हापूर महापालिका काँग्रेस, राष्ट्रवादीकडून खेचून आणण्याचं भाजपसमोर आव्हान, प्रभाग क्रमांक 25 चं गणित काय?
| Updated on: Aug 20, 2022 | 3:02 PM
Share

कोल्हापूर : महापालिकेला मागील तीन वर्षांपासून निवडणुकीची प्रतीक्षा आहे. महापालिकेत या आधी 2015 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये कोल्हापूर मनपात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचं (Congress- NCP) वर्चस्व होतं. या आघाडीसोबत शिवसेनेच्या काही नगरसेवकांचीही साथ होती. आता राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळल्यानंतर आघाडीत ऐन मनपा निवडणुकीपर्यंत किती एकजूट राहते, हे सांगता येत नाही. त्यातच शिवसेना फोडून शिंदे गटाला सोबत घेत भाजपने आपणच प्रबळ असल्याचा दावा पुन्हा एकदा केलाय. एवढच नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्षपद खणखणीत रितीने भूषवलेले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे कोल्हापूरचेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात चंद्रकांत दादांना मंत्रिपपदही मिळालंय. त्यामुळे यंदा महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते भाजपाकडे वळतील तसेच शिवसेनेतील काही उमेदवार भाजपसोबत हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूरात ताराराणी आघाडीलाही विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाक क्रमांक 25 मधील राजकीय गणित आणि स्थिती जाणून घेऊया

प्रभाग क्रमांक 25 ची लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 ची एकूण लोकसंख्या 18 हजार 246 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 744 तर, अनूसुचित जमातीची लोकसंख्या 183 इतकी आहे.

प्रभाक क्रमांक 25 चे आरक्षण (13 मे 2022 च्या सोडतीनुसार) :

कोल्हापूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 25 मधील वार्ड क्रमांक 25 (अ) मागासवर्ग प्रवर्गासाठी, वार्ड क्रमांक 25 (ब) सर्वसाधारण महिला, तर वार्ड क्रमांक 25 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.

प्रभााक क्र. 25ची व्याप्ती :

चंबुखडी पंपींग स्टेशन, फुलेवाडी परिसर, बोंद्रेनगर, गंगाई लॉन, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कणेरकर नगर, गंधर्व नगरी, इंगवले कॉलनी, शेळके कॉलनी, गजानन कॉलनी, फुलेवाडी गायरान झोपडपटटी, कोतवालनगर, शिवशक्ती कॉलनी, शाहू चौक रिंग रोड, बालावधूत नगर, वासुदेव मंदीर, नृसिंह कॉलनी, गंधर्वनगरी, चिंतामणी पार्क, श्री संत सेना महाराज सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.

उत्तर: रि.स.नं. 1417 जवळील पंचगंगा नदी मनपा हददीने पूर्वेस रि.स.नं. 1430 पर्यंत

पूर्व : पंचगंगा नदीपासून रि.स.नं. १४३० पूर्व बाजूने दक्षिणेकडे शिंगणापूर रस्ता क्रॉस करुन दक्षिणेकडे लक्षतीर्थ तलावाचे पश्चिम बाजूकडून नाल्याने लक्षतीर्थ ते चंबूखडी पाणंद रस्ता तेथून पूर्वेकडे नर्मदा कॉलनी १२ मी. डीपी रोडने महाभद्र रेसिडेन्सी चौक ते गगनबावडा रोडवरील शेतकरी हॉटेल पासून पूर्वेकडे मेन रोडने गंगावेश भारत पेट्रोल पंपापासून दक्षिणेकडे हिराश्री लेक सिटी प्रोजेक्ट मागील बाजूच्या नाल्याने हरिओमनगर पश्चिम बाजू नाल्याने माजगावकर मळा प्रवण रेसिडेन्सी चौक ते बिडी कामगार उत्तर बाजूने न्यू कणेरकर चौक वाचनालय हॉलसमोरुन उत्तरेस इथापे टेलर घरापासून पश्चिमेकडे कुलकर्णी यांचे घराचे पूर्व बाजू हददीने शिवशक्ती तरुण मंडळ ते पश्चिमेकडे चिंतामणी पार्क फुलेवाडी रिंग रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपापर्यंत ते क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्याने गणपती मंडळ चौकापर्यंत

दक्षिण: गणपती मंडळ चौक ते अनिल चौगुले घराचे उत्तर बाजू रोडने ज्ञानदिप कॉलनी सरनाईकनगरचे दक्षिणेकडील पूर्व-पश्चिम रोडने पश्चिमेस मनपा हददीपर्यंत

पश्चिम: मनपा हददीने उत्तरेकडे गगनबावडा रोड तेथून उत्तरेकडे मनपा हददीने पंचगंगा नदीपर्यंत

2015 च्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल :

  • काँग्रेस- 30 जागा
  • राष्ट्रवादी- 15 जागा
  • शिवसेना- 04 जागा
  • ताराराणी आघाडी- 19 जागा
  • भाजप- 13 जागा
  • एकूण जागा- 81 जागा
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.