कोल्हापूर मनपा निवडणूक : भाजपची टीम जाहीर, धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील थेट सामना

भाजपने कोल्हापूर मनपासाठी (BJP team for Kolhapur election) टीम जाहीर केली आहे.

कोल्हापूर मनपा निवडणूक : भाजपची टीम जाहीर, धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील थेट सामना
सतेज पाटील-धनंजय महाडिक
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 9:43 PM

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा आखाडा (Kolhapur Municipal corporation Election 2021) तापण्यास सुरुवात झाली आहे. कारण भाजपने कोल्हापूर मनपासाठी (BJP team for Kolhapur election) टीम जाहीर केली आहे. माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव (Mahesh Jadhav) यांच्या नेतृत्त्वात भाजप कोल्हापूर मनपाची निवडणूक लढणार आहे. त्यामुळे साहजिकच कोल्हापुरात पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) विरुद्ध धनंजय महाडिक असा सामना होणार आहे. (Kolhapur Municipal election 2021 BJP announce team, fight between Satej Patil vs Dhananjay Mahadik)

भाजपने पालिका निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या कमिटीत माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह सतेज पाटील यांच्या कट्टर विरोधकांना घेत मोट बांधली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सतेज पाटलांविरोधात महाडिकांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता चांगलाच रंग येणार आहे.

महापालिकेची ही निवडणूक सतेज पाटलांसाठी विधानपरिषदेच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जास्त जागा आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांना याच निवडणुकीत मागे टाकून त्यांची विधानपरिषदेला कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोल्हापूर महापालिकेसाठी भाजपची टीम

BJP Team for Kolhapur election

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची टीम

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्याने सतेज पाटील यांनी अमल महाडिक यांचे वडील महादेवराव महाडिक यांचा विधानपरिषदेत पराभव करत आमदारकी मिळवली होती. तर आमचं ठरलंय म्हणत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठबळ देत लोकसभेला धनंजय महाडिक यांना परभावाची धूळ चारली. याशिवाय 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुतण्या ऋतुराज पाटील यांना अमल महाडीक यांच्या विरोधात मैदानात उतरवत, त्यांचाही पराभव केला.

त्यामुळे सतेज पाटील यांच्यावर चिडून असलेल्या महाडिक परिवारालाच भाजपने पुढे केले आहे. महाडिकांचा समाविष्ट असलेल्या या कमिटीवरच पहिली टीका सतेज पाटील यांनी करत आपला इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाडिक- पाटील आमने सामने येणार असून यात कोण वरचढ ठरणार आता येणारी निवडणूकच दाखवून देणार आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणूक पक्षीय बलाबल (Kolhapur Municipal corporation election 2021)

  • काँग्रेस- 30
  • राष्ट्रवादी- 15
  • शिवसेना- 04
  • ताराराणी आघाडी- 19
  • भाजप- 13
  • एकूण जागा – 81

संबंधित बातम्या 

कोल्हापूर मनपा निवडणूक : पक्षीय बलाबल, सध्या कुणाकडे किती जागा?

कोल्हापूर महापालिका निवडणूक चंद्रकांत पाटलांचं भवितव्य ठरवणार?

निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.