कोल्हापूर महापालिका निवडणूक चंद्रकांत पाटलांचं भवितव्य ठरवणार?

Kolhapur Municipal corporation election 2021 : कोल्हापूरच्या निवडणुकीवरुन राज्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणूक चंद्रकांत पाटलांचं भवितव्य ठरवणार?
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 9:44 PM

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी कोल्हापूरचा आखाडा (Kolhapur Municipal election 2021) सज्ज झाला आहे. नुकतंच प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. लाल मातीत विजयाचा टिळा आपल्याच माथी लागावा, यासाठी दिग्गज राजकीय पैलवानांनी शड्डू ठोकला आहे. गेल्या पाच वर्षापासून केलेल्या कसरतीचा दम दाखवण्याची वेळ आता आली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक राज्याच्या दृष्टीने लक्ष्यवेधी आहे. कारण कोल्हापूरच्या मैदानात एक कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री विरुद्ध एक प्रदेशाध्यक्ष अशी लढत होत आहे. (Chandrakant Patil Kolhapur Municipal election )

राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), काँग्रेस नेते आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील (Satej Patil), आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil) विरुद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशी फाईट आहे. राज्यात जसं भाजप विरुद्ध तीन पक्ष असं चित्र आहे, तसंच कोल्हापुरात तीन मंत्री विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा नेमकी कशी असेल, याची झलक या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळू शकते.

मी कोल्हापूरमधल्या कोणत्याही मतदारसंघात निवडून येऊ शकतो, निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलं होतं. आता कोल्हापूर मनपा निवडणुकीच्या प्रचारात ‘हिमालय’ अवतरणार हे निश्चित आहे.

आधी कोल्हापूर टू कोथरुड, मग कोथरुड ते कोल्हापूर आणि आता कोल्हापूर ते थेट हिमालय, कोल्हापुरातल्या राजकारणात सध्या या टूरची चर्चा पुन्हा एकदा रंगणार आहे.

चंद्रकांत पाटलांसाठी कोल्हापूरची निवडणूक महत्त्वाची का?

चंद्रकांत पाटलांसाठी कोल्हापूरची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. किंबहुना कोल्हापूरच्या निवडणुकीवरुन चंद्रकांत पाटलांचं राजकीय भवितव्य ठरु शकतं. मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणूक पुण्यातून लढले. त्यामुळे त्यांच्यावर अनेक टीका होत आहेत. हा टीकेचा डाग पुसण्याचं आव्हान आणि तोच दबाव त्यांच्यावर असेल.

वाचा : चंद्रकांत पाटलांचं आवाहन उद्धव ठाकरे स्वीकारतील? फडणवीसांना घेऊन मोदींना भेटतील?

पुण्यातून निवडून आल्यामुळे वारंवार चंद्रकांतदादांना टीकेला सामोरे जावं लागतंय. त्यामुळे या महानगरपालिका निवडणुकीत दादांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

मागील निवडणुकीत काय घडलं?

गेल्यावेळी भाजपने स्थानिक ताराराणी आघाडीशी युती करून सत्तेच्या जवळपास यश मिळवलं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चार सदस्यांना आपल्या सोबत घेतल्याने भाजपच्या तोंडचा घास हिरावला गेला.

गेल्यावेळी भाजप सत्तेत होता त्याचा परिणाम महानगरपालिका निवडणुकीतील यशावर झाला.आता सत्ता नसताना ही तीच किमया साधावी लागणार आहे. ताराराणी आघाडीचे प्रमुख असलेले महाडिक कुटुंबीय आता भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली जावी असाही एक मतप्रवाह आहे.

वाचा : चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

मात्र बंडखोरीचा धोका असल्यानं सध्यातरी चंद्रकांतदादा ताराराणी आघाडी आणि भाजप अशी युती करण्याच्याच मानसिकतेत आहेत. गेल्या पाच वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना महानगरपालिकेच्या सत्तेत असले, तरी राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे विकास कामं करता आली नाहीत, विशेषतः थेट पाईपलाईन योजना जाणीवपूर्वक रखडवली गेली असा आरोप आताचे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी करत आहेत. हे आरोप खोडून काढणे चंद्रकांत पाटलांसमोरील आव्हान असेल.

चंद्रकांत पाटलांसमोरील आव्हाने

चंद्रकांत पाटील यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे महापालिकेत सत्ता आणणं. कोल्हापूर महापालिकेत आतापर्यंत महाडिकांच्या ताराराणी आघाडीचा दबदबा राहिला. मात्र गेल्या काही वर्षात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक या सामन्यामुळे, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली आणि त्यांनी महापालिकेत सत्ता स्थापन केली.

आता ताराराणी आघाडीचे नेते असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक आणि त्यांचे चुलत बंधू माजी आमदार अमल महाडिक हे भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता भजापची ताकद वाढल्याचं दिसत असलं, तरी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या रणनीतीला छेद देण्याचं मोठं आव्हान चंद्रकांत पाटलांसमोर असेल.

विधानसभेचा निकाल

कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. हे दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. मात्र 2019 च्या विधानसभा  निकालात कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उलटफेर पाहायला मिळाले.  शिवसेनेने 6 पैकी 5 जागा गमावल्या. तर कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त झाला.

2014 मध्ये ज्या शिवसेना-भाजपने कोल्हापुरातल्या 10 जागांपैकी 8 जागा जिंकल्या होत्या (Kolhapur Vidhansabha Results). त्या युतीला यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये फक्त 1 जागा मिळवता आली. म्हणजे एकट्या कोल्हापुरात तब्बल 7 जागांवर युतीला फटका बसला.

ज्या चंद्रकांत पाटलांनी आघाडीचे डझनभर नेते भाजपात आणले, त्यांना स्वतःचाच जिल्हा राखता आला नाही. इतकंच काय, तर खुद्द त्यांनाच कोथरुडमधू निवडणूक लढवावी लागली. 2014 मध्ये स्वतंत्र लढून जिंकलेल्या जागा यंदा भाजप का जिंकू शकली नाही, यावर आता चंद्रकांत पाटील आणि भाजपने विचार करायची गरज आहे.

चंद्रकांत पाटील यांची कारकीर्द (Chandrakant Patil political journey)

चंद्रकांत पाटील मूळचे राधानगरी तालुक्यातील खानापूरचे. वडिलांचं नाव बच्चू पाटील. ते मुंबईत गिरणी कामगार होते. त्यामुळं लहानपणीच चंद्रकांत पाटील मुंबईला स्थायिक झाले. त्यामुळं शाळाही मुंबईत आणि कॉलेजही मुंबईतच झालं. म्हणजे जन्मानं जरी ते कोल्हापुरातले असले, तरी ते कर्मानं मुंबईकर आहेत.

1978 ला चंद्रकांत पाटील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले आणि त्यानंतर संघटन कौशल्याच्या जोरावर ते जळगावचे प्रचारक झाले.म्हणजे मुंबईतून कोल्हापूरऐवजी थेट जळगाव.

या सगळ्यातच चंद्रकांत पाटील पुन्हा मूळगावी म्हणजे कोल्हापूरला परतले आणि काजू प्रक्रिया उद्योग सुरु केला.राजकारणापासून ते काहीसे दूर गेले.1995 पर्यंत ते उद्योगातच राहिले. पण 2004 ला पाटलांची पुन्हा राजकारणात एन्ट्री झाली आणि त्यांच्या गळ्यात प्रदेश सरचिटणीसपदाची माळ पडली. 2009 आणि 2014 ला ते पदवीधर मतदारसंघातून आमदारही झाले.

चंद्रकांत पाटलांचा सुवर्णकाळ

2014  चंद्रकांत पाटलांच्या आयुष्यातच्या सुवर्णकाळाला इथूनच सुरुवात झाली.भाजप राज्यात सत्तेत आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदाच चंद्रकांत पाटील हे आधी सहकारमंत्री आणि नंतर महसूलमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात उभे राहतील अशी आशा होती.ही निवडणूक चुरशीची होईल असंही वाटत होतं.पण पक्षानं केलेल्या सर्व्हेनं निर्णय फिरला आणि कोल्हापूर ते थेट कोथरुड अशी चंद्रकांत पाटलांची रवानगी झाली.

कोल्हापूर हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. इथं गोकूळच्या निवडणुका असो, जिल्हा बँकेच्या निवडणुका की महानगरपालिकेच्या निवडणुका, धुरळा असा उडतो की विचारायची सोयच नाही. इथला मुश्रीफ गट असो की सतेज पाटलांचा गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं इथलं प्राबल्य सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामानाने कोथरुड हा तसा भाजपचाच गढ.त्यामुळंच मेधा कुलकर्णींना बाजूला सारुन चंद्रकांत पाटलांना संधी मिळाली हीच टीका कायम होते.त्यामुळं आता चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वत:ला सिद्ध करावं लागणारंय हे नक्की.

कोल्हापुरातील सध्याचं काय चित्र?

कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीचीच सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या काही वर्षे आधीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महापालिकेत एकत्र आले होते.

तिन्ही पक्ष आता आगामी निवडणूक एकत्र लढतात की स्वतंत्र हे येत्या काळात स्पष्ट होईल. जागा वाटपातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा फॉर्म्युला वापरण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर मात्र पुन्हा महाविकास आघाडी स्थापन होऊ शकते. विशेष म्हणजे, काही प्रभागात छुपी युती करत भाजप आणि ताराराणी आघाडीला आव्हान देण्याचीही शक्यता आहे

कोल्हापूर महापालिका निवडणूक  पक्षीय बलाबल (Kolhapur Municipal corporation election 2021)

  • काँग्रेस- 30
  • राष्ट्रवादी- 15
  • शिवसेना- 04
  • ताराराणी आघाडी- 19
  • भाजप- 13
  • एकूण जागा – 81

संबंधित बातम्या 

कोल्हापूरचा नाद खुळा, निवडणुकीआधीच गुलाल उधळा

Rajiv Awale | दोन दिवसांपूर्वी प्रवेश आणि त्याच राष्ट्रवादीत का विरोध?

(Kolhapur Municipal Corporation election will decide the future of Chandrakant Patil?)

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.