चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

आता चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्यासमोर होम पीचवरच आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. | Chandrakant Patil

चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

कोल्हापूर: चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आता पक्षातूनच करण्यात आली आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्यासमोर होम पीचवरच आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांतदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासोबत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. (BJP workers demand for Chandrakant Patil resignation)

चंद्रकांत पाटील यांनीही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, असा आरोप कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे यावर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवामुळे चंद्रकांत पाटलांच्या वर्चस्वाला धक्का

चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांमधील लढतीमुळे पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची झाली होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजप याठिकाणी सहजपणे विजय मिळवेल असा दावा केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरूण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा दणदणीत मताधिक्याने पराभव केला होता. याशिवाय, भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या नागपूरमध्येही काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला होता. हे दोन्ही पराभव राज्य भाजपसाठी मोठा धक्का होता.

चंद्रकांत पाटील शब्दाचे पक्के आहेत, त्यांनी खरंच हिमालयात जायला पाहिजे: अब्दुल सत्तार

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर शिवसेना नेते अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना चिमटा काढला होता. चंद्रकांत पाटील हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी आता खरंच हिमालयात जाण्याची वेळ आली आहे. चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करु. इतकेच नव्हे तर मोदी साहेबांनाही हिमालयाची खूप माहिती आहे. त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी; हसन मुश्रीफांचा सणसणीत टोला

‘भाजपने पुण्याची हातातली जागा गमावली तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’

चंद्रकांत पाटील यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे- नवाब मलिक

(BJP workers demand for Chandrakant Patil resignation)

Published On - 2:49 pm, Tue, 15 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI