सार्वजनिक कामापासून वैयक्तिक कामांची गाऱ्हाणी मंत्र्यांसमोर, कोल्हापूरच्या तीन मंत्र्यांचा जनता दरबार

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज (3 फेब्रुवारी) जनता दरबार (Kolhapur minister janta darbar)  घेतला.

Kolhapur minister janta darbar, सार्वजनिक कामापासून वैयक्तिक कामांची गाऱ्हाणी मंत्र्यांसमोर, कोल्हापूरच्या तीन मंत्र्यांचा जनता दरबार

कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज (3 फेब्रुवारी) जनता दरबार (Kolhapur minister janta darbar)  घेतला. मंत्र्यांच्या या पहिल्याच जनता दरबाराला लोकांची चांगलीच गर्दी उसळली. आपल्या तक्रारी, अर्ज घेऊन जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून लोक शासकीय विश्रामगृहात आले होते. सार्वजनिक कामांपासून ते वैयक्तिक कामापर्यंतची अनेक गाऱ्हाणी लोकांनी या मंत्र्यांसमोर मांडली. या सर्व तक्रारींचे निराकरण किती वेळात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

मंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर कोल्हापुरात येताच हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार घेण्याचे जाहीर केलं होतं. यावेळी त्यांनी आपल्या तक्रारी घेऊन येण्याचं आवाहन जिल्हावासियांना केलं होतं. आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयात चकरा मारणाऱ्या लोकांना त्यांचं काम होणार आहे की नाही, होणार असेल तर किती दिवसात आणि नसेल तर त्याचं कारण काय हे लोकांना कळावं यासाठी हा जनता दरबार भरवण्यामागचा उद्देश होता.

 

Kolhapur minister janta darbar, सार्वजनिक कामापासून वैयक्तिक कामांची गाऱ्हाणी मंत्र्यांसमोर, कोल्हापूरच्या तीन मंत्र्यांचा जनता दरबार

त्यामुळं अपेक्षेप्रमाणे पहिल्या जनता दरबाराला जिल्ह्यातील लोकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. एका बाजूला हे तिन्ही मंत्री जिल्ह्यातील अधिकारी यांना सोबत घेऊन तक्रारदारांना भेटत होते तर दुसऱ्या बाजूला तक्रारदारांची रांग वाढतच चालली होती. कोणी वैयक्तिक विषय तर कोणी सार्वजनिक विषय घेऊन मंत्र्यांना भेटत होतं. कोणाला एखादा सावकार नडत होता. तर कोणाची आर्थिक फसवणूक झाली होती. हे सर्व जण न्याय मिळेल या अपेक्षेने रांगेत उभे (Kolhapur minister janta darbar) होते.

रांगेत उभे असताना मंत्र्यांची भेट होईल की नाही? तक्रारीला कसा प्रतिसाद मिळेल का? या विचारात असलेले तक्रारदार बाहेर येताना मात्र आश्वासक चेहऱ्यात दिसत होते. काहींनी तर आपल्या काम ज्या अधिकाऱ्याकडे आहे त्या अधिकाऱ्याला पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्यामुळे हा जनता दरबार त्यांच्यासाठी आज तरी दिलासा देणारा ठरला आहे.

Kolhapur minister janta darbar, सार्वजनिक कामापासून वैयक्तिक कामांची गाऱ्हाणी मंत्र्यांसमोर, कोल्हापूरच्या तीन मंत्र्यांचा जनता दरबार

आज पहिलाच जनता दरबार असल्यानं लोकांनी मोठी गर्दी होती. त्यामुळे काहींची यात गैरसोय देखील झाली. त्यामुळे पुढच्या वेळेस योग्य नियोजन करावं अशी अपेक्षा देखील काहींनी व्यक्त केली आहे.

या जनता दरबारात जवळपास 900 निवेदन मंत्र्यांना मिळाली. न्याय मिळणार हा विश्वास देऊ शकले नाही इतकी गर्दी झाल्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले. तर हे माझं सरकार आहे. असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. यासाठीच हा जनता दरबार असल्याचं ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

Kolhapur minister janta darbar, सार्वजनिक कामापासून वैयक्तिक कामांची गाऱ्हाणी मंत्र्यांसमोर, कोल्हापूरच्या तीन मंत्र्यांचा जनता दरबार

आज शहरी असो किंवा ग्रामीण जिल्ह्यातील सर्वच भागातील लोकांनी न्याय मिळेल या आशेने शासकीय विश्रामगृहातील रांगेत आपला दिवस घालवला आहे. आता तरी महिन्याभरात या तक्रारदारांची काम होऊन त्यांना दिलासा मिळेल, असे बोललं जात (Kolhapur minister janta darbar)  आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *