
कोल्हापूर | 26 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल कोल्हापूरमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. कोल्हापुरात कुणाला तरी नोटीस आली. कुणाच्या तरी घरी सीबीआयकडून चौकशी झाली. कुणाच्या घरी इनकम टॅक्सची धाड पडली. त्यांच्या पत्नीने धाडस केलं. अशा धाडी घालण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला अशी भूमिका घेतली. मात्र त्या कुटुंबाच्या प्रमुखाने ते धाडस दाखवलं नाही. त्यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. यातून आपली सुटका करुन घेण्याची भूमिका घेतली, असं म्हणस शरद पवार ययांनी हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली. या टीकेला आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन शब्दात उत्तर दिलं आहे. नो कमेंट्स!, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.
जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांवर काय जादू केलीय? मला माहित नाही. आव्हाडांनी ठाण्यामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष संपवला. त्यांनी अशी भाषा बोलायला नको होती. एकनाथ शिंदे गुहाटीला गेले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पाठिंबाचं पत्र शरद पवारांना दिलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांची देखील सही होती. त्यावेळी गृहनिर्माण खातं जितेंद्र आव्हाड हृदयाला कवटाळून बसले होते. त्यावेळी कुठे गेला होता तुमचा विचार कोल्हापूरमध्ये कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती कर्कर वाजते. ती जेव्हा बसेल तेव्हा कळेल, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षाचं कामकाज सुरु असताना अचानकपणे काही नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत जात सरकार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात वारंवार चर्चेत येतो. त्यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अजितदादा सोबत का गेलो हे याआधीही सांगितलं आहे. आमचा हा निर्णय पक्षाच्या विस्तारासाठी आहे. हा आमचा सामूहिक निर्णय आहे. याबाबतच्या चर्चा आमच्या दैवताबरोबर झाल्या होत्या, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.
शरद पवार यांची काल कोल्हापुरात सभा झाली. ही सभा हसन मुश्रीफ यांनी फेसबुकवर लाईव्ह पाहिल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. त्यावर माझ्या अकाउंटवरून ही सभा माझ्या टीमने पाहिली. मी कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये होतो. टीका करणारे स्थानिक नेते अतृप्त आत्मे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा पक्ष आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.