Eknath Shinde: आसामच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे एकनाथ शिंदेंना पत्र, गुवाहाटी त्वरित सोडा, तुमच्या घोडेबाजारामुळं आसाम बदनाम होतेय

| Updated on: Jun 24, 2022 | 3:49 PM

राज्यात अशाप्रकारे गंभीर पूर परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या आसाममध्ये राहण्यामुळं तुमचं इथं आदरतिथ्य होत आहे. हे योग्य नाही. एकीकडं राज्यात पूरपरिस्थिती असताना तुमच्यासारख्या बंडखोरांचं आदरतिथ्य होणं योग्य नाही. कारण तुम्हाला संविधानिक मूल्याशी काहीही देणंघेणं दिसत नाही.

Eknath Shinde: आसामच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे एकनाथ शिंदेंना पत्र, गुवाहाटी त्वरित सोडा, तुमच्या घोडेबाजारामुळं आसाम बदनाम होतेय
बहुमत हातात आहे तर मग शिंदे गट मुंबईत का येत नाही?
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गुवाहाटीत (Guwahati) आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर आमदार आहेत. यामुळं माध्यमातून गुवाहाटी चर्चेत आलंय. आमदारांना घोडेबाजारासाठी गुवाहाटी हे ठिकाण असल्याची बदनामी होतेय. तसेच आसाममध्ये सध्या पूरपरिस्थिती आहे. त्यामुळं या कामात तुमच्या असण्यामुळं अडथळे निर्माण होतात. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर गुवाहाटी सोडा, असं पत्र आसामचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोराह (Bhupen Kumar Borah) यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिले. संविधानिक मूल्य (Constitutional Value) आणि निष्ठा यांचा या आमदारांना आदर नाही. अशा आमदारांसाठी गुवाहाटी सुरक्षित असल्याची प्रतीमा निर्माण होते. शिंदेंसह महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार हे गुवाहाटीत आलेत. यामुळं माध्यमांमध्ये गुवाहाटीची प्रतीमा बदनाम होत आहे. बंडखोर आमदारांनी त्वरित आसाम सोडावं. हे आमदार गुवाहाटीत असल्यानं आसाम दबनाम होतेय, असं पत्र बोराह यांनी शिंदे यांना लिहिलंय.

भूपेन कुमार बोराह यांचे ट्वीट

तुमच्या असण्यानं पूरग्रस्तांच्या मदतकार्यात अडथळे

बोराह त्यांच्या पत्रात म्हणतात, आसामधील लोकं हे नैतिकचा आणि मूल्यांचा आदर करतात, याची आपल्याला जाणीव असेल. तुम्ही महाराष्ट्रातून काही आमदारांना गुवाहाटीत आणलं. गुवाहाटीतील आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून घोडाबाजार केला जात असल्याचा आरोप होतोय. यामुळं माध्यमातून आसामची प्रतीमा खराब होत आहे. यामुळं राज्यातील वातावरण खराब झालंय. आसाममध्ये पूरपरिस्थिती आहे. पूरग्रस्त लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 6 एप्रिलपासून 107 लोकांचा पुरात बळी गेल्याचं आसाम सरकारची आकडेवारी सांगते. 14 जूनपासून 35 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यातले सुमारे 55 लाख लोकं हे पूरपीडित आहेत.

आसामची प्रतीमा खराब होतेय

राज्यात अशाप्रकारे गंभीर पूर परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या आसाममध्ये राहण्यामुळं तुमचं इथं आदरतिथ्य होत आहे. हे योग्य नाही. एकीकडं राज्यात पूरपरिस्थिती असताना तुमच्यासारख्या बंडखोरांचं आदरतिथ्य होणं योग्य नाही. कारण तुम्हाला संविधानिक मूल्याशी काहीही देणंघेणं दिसत नाही. आसामनं भारतरत्न गोपीनाथ बोरडोलोई आणि तरुण गोगाई यासारखे मुख्यमंत्री दिलेले आहेत. परंतु, विद्यमान मुख्यमंत्री डॉ. हेमंत शर्मा हे तुमच्या घोडेबाजाराला सहकार्य करत असल्याचा आरोप होतोय. आसाममधील भाजपचे मुख्यमंत्री आणि सरकार तुम्हाला सहकार्य करत आहेत. यामुळं आसामच्या लोकांची प्रतिमा खराब होत आहे. मुख्यमंत्री शर्मा आणि सरकारी यंत्रणा ही पूर पीडितांच्या व्यवस्थापनात लागलेली आहे. पण, तुमच्या गुवाहाटीत येण्यामुळं अडथळा निर्माण होत आहे. आसामच्या भल्यासाठी लवकरात लवकर आसाम सोडा, अशा आशयाचं पत्र आसामचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना लिहीलंय.